औरंगजेबाला सरकारी निधीची चादर, औरंगजेबावर केंद्र सरकार मेहरबान? कबरीवर लाखो रुपये उधळले

Aurangzeb Tomb Central Government Fund : स्वराज्यावर चाल करुन आलेल्या औरंगजेबावरुन अनेकदा वाद पेटल्याचं पहायला मिळालं.
Central government spent lakhs of rupees on Aurangzeb tomb
Central government spent lakhs of rupees on Aurangzeb tombSaam Tv News
Published On

नवी दिल्ली : स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करुन महाराष्ट्रातील शिवशाही संपवणारा, स्वराज्याचा शत्रू असणारा औरंगजेब हे नाव ऐकलं तरी तळपायाची आग मस्तकात जाते. महाराष्ट्रावर चाल करुन आलेल्या औरंगजेबाजाच्या अतीची याच महाराष्ट्रात माती झाली. त्याच्या कबरीवरुन आजही वाद सुरुच आहे. कारण आता केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपयांचा निधी पुरवल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केलाय.

औरंगजेबाचे व्हॉट्सएप स्टेटस ठेवले महणून , जुलूसमध्ये फोटो नाचवले म्हणून किंवा घोषणा दिल्या म्हणून राज्यात अनेकदा मोर्चे निघाले, दगडफेक झाली. अगदी दंगलसदृष्य परिस्थितीही उद्भवली. मात्र आता केंद्र सरकारच्या पुरात्तत्व विभागाकडून कबरीचं संवर्धन करण्यासाठी 2011 पासून लाखो रुपयांचा निधी बहाल करण्यात आला. आतापर्यंत औरंगजेबाच्या कबरीच्या संवर्धनासाठी किती निधी देण्यात आला ते ही पाहुया.

Central government spent lakhs of rupees on Aurangzeb tomb
Ladki Bahin Yojna : लाडकींना महिला दिनाचं खास गिफ्ट, दोन महिनांचा हफ्ता एकत्र येणार

औरंगजेबाच्या कबरीला केंद्राचा पैसा

2011-12 47 हजार

2012-13 80 हजार

2017-18 15 हजार

2020-21 2 लाख 55 हजार

2022-23 2 लाख 60 हजार

एकीकडे औरंगजेबाचं उद्दातीकरण केल्यामुळे अबू आझमींना अधिवेशानातून निलंबित करण्यात आलं तर आता लाखो रुपयांचा निधी औरंगजेबाच्या कबरीसाठी दिल्यामुळे भाजपचे खासदार उदयन राजें भडकले. आणि त्यांनी थेट कबरीवर जेसीबी चालवण्याची मागणी केलीये. छत्रपती संभाजीराजेंवर अमानूष अत्याचार कऱणाऱ्या औरंगजेबाच्या क्रूरतेचे इतिहासात दाखले दिले जातात. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवर एमएमआयनं फुल उधळली म्हणून आकाडंताडंव करणारे राजकीय पुढारी केंद्र सरकारनं दिलेल्या निधीवर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Central government spent lakhs of rupees on Aurangzeb tomb
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलसाठी अनोखा नियम, 'ती' एक ओव्हर ठरु शकते सामन्याचा टर्निंग पॉइंट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com