
दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आता अवघा एक दिवस दूर आहे. भारत आणि न्यूझीलंड असा हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ विजयसाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. या फायनलपूर्वी क्रिकेटमधील एक अनोखा नियम आता समोर आला आहे. तो म्हणजे या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आता ती एक ओव्हर टर्निंग पॉइंट ठरू शकते.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलचे आयसीसीचे काही नियम आतापर्यंत बऱ्याच जणांना माहिती नव्हते. पण हे नियम आता या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलच्या निमित्ताने समोर येत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमधील दोन्ही संघांची ती एक ओव्हर सर्वात महत्वाची ठरणार आहे. पण ही ओव्हर नेमकं कोणती? ते आपण जाणून घेऊया.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीत पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना समान एक गुण दिला जातो. जर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर गटामध्ये अव्वल असणारा संघ फायनलमध्ये पोहोचू शकतो. पण जर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाऊस पडला तर काय? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलसाठी राखीव दिवस ठेवलेला असतो. पण राखीव दिवशीही पाऊस पडत असेल तर काय करायचं? हा प्रश्न सर्वांपुढे असेल.
साधारण एकदिवसीय सामन्यातही दोन्ही संघांचा २० ओव्हर्सचा खेळ झाला तर डकवर्थ लुईस नियमांनुसार विजेता घोषीत केला जाऊ शकतो. पण जर २० ओव्हर्सचा खेळ झाला नाही, तर संयुक्तपणे दोन्ही संघांना विजेतेपद देण्यात येते. पण जर सामना झाला आणि दोन्ही संघांच्या समान धावा झाल्या तर त्यानंतरही सुपर ओव्हर ही निर्णायक ठरू शकते. या एका सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल लागू शकतो. त्यामुळे जर चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना टाय झाला तर त्यानंतरचे दोन्ही संघांचे ती एक ओव्हर ही टर्निंग पॉइंट ठरु शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.