Ladki Bahin Yojna : लाडकींना महिला दिनाचं खास गिफ्ट, दोन महिनांचा हफ्ता एकत्र येणार

Ladki Bahin Yojna : आता लाडक्या बहीणींसाठी खूशखबर आहे. कारण लाडकीला २१०० नाही तर थेट ३००० रुपये मिळणार आहेत. मात्र हे तीन हजाराचं गिफ्ट नेमकं कसं असणार आहे? पाहूयात या रिपोर्टमधून
Ladki Bahin Yojana February and March Money
Ladki Bahin Yojana February and March MoneySaam Tv News
Published On

मुंबई : निकषांची पडताळणी सुरु झाल्याने लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता रखडलेला आहे. मात्र आता महिला दिनाचं औचित्य साधून तथा स्पेशल गिफ्ट म्हणून महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्यांचा हफ्ता एकत्र यायला सुरवात झाली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात निकषांची कडक तपासणी करण्यात आली आणि त्यामुळे किती महिला आतापर्यंत अपात्र ठरल्या आणि अजून किती अपात्र ठरू शकतात पाहुयात.

50 लाख लाडक्या अपात्र?

दोन महिन्यात 9 लाख लाभार्थींची संख्या कमी

जानेवारीत 5 लाख महिला अपात्र

फेब्रुवारीत 4 लाख महिला अपात्र

भविष्यात 50 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता

त्यामुळे दरमहा 135 कोटी रुपये वाचणार

वर्षाला 1620 कोटी रुपये वाचणार

Ladki Bahin Yojana February and March Money
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलसाठी अनोखा नियम, 'ती' एक ओव्हर ठरु शकते सामन्याचा टर्निंग पॉइंट

काही महिलांच्या नावात त्रुटी असल्याने अंगणवाडी सेविका त्या नावांची पडताळणी आता घरोघरी जाऊन करणार आहेत. त्यामुळे आणखी काही लाडक्या अपात्र ठरण्याची शक्यता आहे. दोन महिन्यांच्या एकत्रित 3000 हजारांचा हफ्ता तर लाडक्यांना मिळायला सुरवात तर झालीयं मात्र 1500 चे 2100 कधी होणार याची उत्सुकताही लाडकींना आहे.

Ladki Bahin Yojana February and March Money
Freight Train Derails : सांगलीत रेल्वे दुर्घटना! मालवाहतूक बोगी दुसऱ्यांदा रुळावरून घसरली, मुंबई-पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com