Saam Tv
सध्या महिला पुरुषांसारख्याच मोठ्या संख्येने चांगल्या पदावर कार्यरत आहेत.
त्यामुळे महिन्याला जर त्यांनी सेविंग करून चांगल्या विश्वासू बॅंकेत गुंतवणूक केली तर त्याचा चांगला परतावा सुद्धा त्या मिळवू शकतात.
त्यासाठी तुम्हाला सगळ्यात प्रसिद्ध अशी योजना म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना फायदेशीर ठरेल.
या योजनेत तुम्हाला ७.५ टक्क्यांपर्यंतचे व्याज तुम्हाला मिळू शकतं.
तुम्ही वयाच्या कोणत्याही वर्षी या योजनेत गुंतवणुक करू शकता.
या महिलांच्या योजनेत दोन वर्षांचा कालावधी असणार आहे.
या योजनेत महिलांनी १००० रुपयांपर्यंत दरमहा गुंतवणूक करू शकता. जर दोन वर्षे ही रक्कम भरली तर त्याची एकूण किम्मत २ लाखांपर्यंत जाते.
जेव्हा त्याची मॅच्युरिटी होते तेव्हा २,२३,०४४ रुपयांचा परतावा मिळतो.