Jasprit Bumrah : राडा होणार! जसप्रीत बुमराहची खतरनाक बॉलिंग; मुंबई इंडियन्स नवा डाव टाकणार, VIDEO

Jasprit Bumrah News : जसप्रीत बुमराहने सरावात खतरनाक बॉलिंग केली आहे. मुंबई इंडियन्स नवा डाव टाकण्याच्या तयारी आहे.
Jasprit Bumrah News
Jasprit BumrahSaam tv
Published On

Jasprit Bumrah: मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह गेल्या ३ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर मुंबईचा स्टार गोलंदाज बाहेर असल्याने संघ बॅकफूटवर गेल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान, मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह कमबॅक करणार असल्याची चर्चा सुरु आहे. जसप्रीत बुमराहचा सरावादरम्यान गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे.

जसप्रीत बुमराह गेल्या काही दिवसांपासून पाठदुखीमुळे त्रस्त होता. शेवटच्या सामन्यात जसप्रीत दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या सामन्यात दिसला नाही. मात्र, जसप्रीत आता सरावादरम्यान खेळपट्टीवर गोलंदाजी करताना दिसल्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.

भारतीय संघ डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कसोटी सामने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध खेळला होता. या संपूर्ण मालिकेत जसप्रीत बुमराहने चांगली कामगिरी केली होती. या मालिकेच्या शेवटच्या सामन्यात स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे बुमाराह चॅम्पियन ट्रॉफीमधून बाहेर गेला होता. त्यानंतर आता बुमराह बेंगळुरु येथील नॅशनल क्रिकेट अकॅडमीत सराव करताना दिसला.

Jasprit Bumrah News
IPL 2025 RR vs CSK: सीएसके की आरआर कोण आहे बलवान? कसा आहे दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

अकॅडमीत गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमराह मोठ्या ताकदीने गोलंदाजी करताना दिसत आहे. बुमराहची गोलंदाजी पाहून तो लवकरच मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दिसण्याची शक्यता आहे. बुमराह मुंबई इंडियन्ससाठी महत्वाचा खेळाडू आहे.

Jasprit Bumrah News
license free electric scooter : परवान्याची गरज नसलेली हटके इ स्कूटर; जाणून घ्या किंमत, बॅटरी आणि बरंच काही

आयपीएल २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पहिला सामना सीएसके विरुद्ध झाला. मुंबईला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मुंबईचा दुसरा सामना गुजरात टायटन्ससोबत होता. मुंबईला दुसऱ्या सामन्यातही पराभव स्वीकारावा लागला. मुंबईने दोन्ही सामने जसप्रीत बुमराहविना खेळले होते. बुमराहला सरावातील गोलंदाजी पाहून एनएसीएकडून त्याला ग्रीन सिग्नल मिळण्याची व्यक्त केली जात आहे. जसप्रीत बुमराह देखील त्यांच्या सिग्नलची वाट पाहत आहेत.

Jasprit Bumrah News
kalyan railway station : कल्याण रेल्वे स्टेशनने थकवलंय पाणी बिलाचे ४ कोटी; KDMCकडून कनेक्शन कट

बुमराहचं संघासाठी मोठं योगदान

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वात ५ वेळा आयपीएलची फायनल जिंकली आहे. आयपीएलचे ५ किताब जिंकण्यामध्ये बुमराहने मोठी भूमिका निभावली आहे. बुमराहने २०१३ साली आयपीएलमध्ये डेब्यू केलं होतं. तेव्हापासून बुमराह मुंबईसाठी खेळत आहे. आतापर्यंत बुमराहने मुंबईसाठी १३३ सामने खेळून १६५ फलंदाजांना बाद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com