Police Bharti : तयारीला लागा! राज्यात तब्बल १०,००० पोलिसांची भरती, तारीख आली समोर

Police Bharti 2025: राज्यात सप्टेंबर महिन्यात पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. उन्हाळ्यात तापमान जास्त आहे. तर त्यानंतर पावसाळ्यात मैदानी चाचणी घेऊ शकणार नाही, त्यामुळे पोलिस भरती गणेशोत्सवानंतरच होणार आहे.
Police Bharti
Police BhartiSaam Tv
Published On

पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्यात १० हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. १५ सप्टेंबर २०२५ पासून ही भरती केली जाणार आहे. गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्याची मान्यता दिली आहे. त्यानंतर आता लवकरच पोलिस भरती (Police Bharti) सुरु होणार आहे.

Police Bharti
Metro Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मेट्रोत भरती सुरु, पगार २.८० लाख, पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच पोलिस भरतीची मैदानी चाचणी सुरु होणार आहे. साधारणपणे १५ सप्टेंबरनंतरच पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होईल, असं सांगण्यात येत आहे.

यंदा पोलिस भरतीमध्ये (Police Bharti 2025) एकूण १० हजार पदे भरली जाणार आहे. राज्यात गणेशोत्सव झाल्यानंतर लगेचच पोलिस भरती होणार आहे. ६ सप्टेंबरला गणपती विसर्जन होतील.त्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजन गृह विभागाने केलं आहे.

यंदा १० हजार पोलिस भरतीसाठी १२ ते १३ लाख अर्ज येऊ शकतात. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने सध्या पोलिस भरती घेतली जाऊ शकणार नाही. पावसामुळे मैदानी चाचणी घेता येणार नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्येच ही भरती घेण्यात येणार आहे.

मागच्या वर्षी २०२४ मध्ये पोलिस भरतीच्या १७ हजार जागांसाठी १७ लाख अर्ज आले होत. दरम्यान, आताही काही लाखांमध्ये अर्ज येण्याची शक्यता आहे.

Police Bharti
Central Bank Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सेंट्रल बँकेत नोकरी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

पोलिस भरतीचे निकष

पोलिस भरतीमध्ये एका पदासाठी एकाच ठिकाणी अर्ज करायचे आहे. जर तुम्ही जास्त अर्ज भरले तर ते बाद करण्यात येईल. दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल उमेदवाराला बाद ठरवण्यात येईल. जर एखादा उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात उपस्थित राहिला तर त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल चाचणी देता येणार नाही. या भरतीसाठी ४ महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

Police Bharti
ITBP Constable Bharti 2025: 10 वी पास उमेदवारांना मिळेल सरकारी नोकरी; कॉन्स्टेबल पदांसाठी भरती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com