ITBP Constable Bharti 2025: 10 वी पास उमेदवारांना मिळेल सरकारी नोकरी; कॉन्स्टेबल पदांसाठी भरती

ITBP Sports Quota Constable Bharti 2025: ITBP मध्ये स्पोर्ट्स कोट्यातून कॉन्स्टेबल पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवार २ एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.
ITBP Constable Bharti
ITBP Sports Quota Constable Bharti 2025saam tv
Published On

दहावी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी चालून आलीय. ITBP मध्ये स्पोर्ट्स कोट्यातून कॉन्स्टेबल पदांची भरती केली जाणार आहे. याबाबत इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाने जाहिरात देखील जाहीर केलीय. ज्या उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. ते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार ITBP recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतील.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 एप्रिल 2025 आहे. ITBP ने क्रीडा कोट्याअंतर्गत 133 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. या भरती प्रक्रियेतून गुणवंत खेळाडूंची भरती केली जाणार आहे. क्रीडा कोट्यातील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्रता निकष काय आहेत आणि अर्जदारांची निवड कशी केली जाईल? हे जाणून घेऊ.

ITBP Constable Bharti
PM Life Insurance Scheme: वर्षाला ४३६ रुपये भरा, मिळवा २ लाखांचा विमा, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

ITBP Constable Bharti 2025 Eligibility Criteria: आयटीबीपी कॉन्स्टेबल भरती २०२५ पात्रता निकष

क्रीडापटू, जलतरणपटू आणि नेमबाजीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेले खेळाडू या भरतीसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ ते २३ वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेतही सूट देण्यात आलीय.

ITBP Constable Bharti
UPI Bank Service: ऐका हो ऐका! एक एप्रिलपासून बंद होईल 'या' मोबाईल नंबरवरील बँकिंग आणि UPI ची सेवा

अर्ज करण्यासाठी किती फी भरावी लागेल?

सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील पुरुष उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला अर्जदारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलीय. अर्जाची फी ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.

असा करा अर्ज : ITBP Sports Quota Bharti 2025

ITBP recruitment.itbpolice.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

होमपेजवर दिलेल्या नवीन युझर्स म्हणून आधी नोंदणी करावी लागेल.

प्रविष्ट करून नोंदणी करा आणि फॉर्म भरा.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.

निवड प्रक्रियेसाठी केवळ तेच उमेदवार निवडले जातील, जे अधिसूचनेत दिलेल्या पात्रता पूर्ण करतील. कागदपत्रांची पडताळणी, शारीरिक मानक चाचणी (PST) आणि वैद्यकीय तपासणीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com