अमरावतीत भरदिवसा थरार! तरुणाची निर्घृण हत्या, हाताचा पंजाच छाटल्याने उडाली खळबळ

Brutal daylight Killed In Amravati Maharashtra: अमरावतीत भरदिवसा दोन थरारक घटनांनी खळबळ उडाली आहे. एका तरुणाची निर्घृण हत्या तर दुसऱ्या घटनेत हाताचा पंजा कापल्याने युवकाचा मृत्यू झाला. शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
Police investigate the crime scene after two shocking and brutal attacks on youths in Amravati city.
Police investigate the crime scene after two shocking and brutal attacks on youths in Amravati city.saam tv
Published On

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात घडलेल्या दोन अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटनांमुळे संपूर्ण अमरावती शहर हादरून गेले आहे. एका बाजूला भरदिवसा तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, दुसऱ्या घटनेत हल्लेखोरांनी तरुणाचा हाताच पंजाच मनगटापासून कापून टाकल्याची थरारक माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरात येथील बेलोकर हॉस्पिटल जवळील प्रशांत नगर गार्डन परिसरात ही धक्कादायक घटना घडली. बेलापुरा येथील रहिवासी असलेला भूषण विजय कैथवास हा तरुण या परिसरात असताना चार अज्ञात आरोपीनी त्याच्यावर अचानक प्राणघातक हल्ला चढवला. धारदार शस्त्राने केलेल्या या भीषण हल्ल्यात भूषणाचा जागेवरच मृत्यू झाला. या हत्यचे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दुसऱ्या एका थरारक घटनेत राजेंद्र नगर परिसरात चार तरुणांनी मिळून एका युवकावर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की हल्लेखोरांनी त्या युवकाचा हातात पंजा पडल्याचे पाहून परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला.

Police investigate the crime scene after two shocking and brutal attacks on youths in Amravati city.
Wari Accident : वारीत पुन्हा भीषण अपघात, भरधाव पिकअपने वारकऱ्यांना दिली जोरात धडक

घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या युवकाला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Police investigate the crime scene after two shocking and brutal attacks on youths in Amravati city.
Accident News : मुंबई -गोवा महामार्गावर भयंकर अपघात, भरधाव कारची डंपरला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये, आरोपींचा शोध सुरू

भरदिवसा घडलेल्या या लागोपाठच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या दोन्ही घटनांमधील आरोपी निष्पन्न झाले असून, पोलीस पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, या घटनांमुळे अमरावती शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com