पोलीस चेकिंग सुरू असल्याचे बघताच मित्राने डब्यात टाकले ड्रग्ज, विमानतळ कर्मचाऱ्याने मारला डल्ला; कोल्हापूरमध्ये नेमके काय घडले?

Kolhapur Airport Charas Smuggling Case Details: कोल्हापूर विमानतळावर चरस तस्करीचा धक्कादायक प्रकार उघड. प्रवाशाने भीतीने डब्यात टाकलेले ड्रग्ज विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली.
Kolhapur Police arrested an airport employee after he allegedly attempted to sell charas recovered from a toilet dustbin.
Kolhapur Police arrested an airport employee after he allegedly attempted to sell charas recovered from a toilet dustbin.saam tv
Published On

रणजीत माजगांवकर, साम टीव्ही

कोल्हापूर विमानतळावरून चरस सारख्या अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. कारवाईच्या भीतीने प्रवाशाने स्वच्छतागृहाच्या कचऱ्याच्या डब्यात टाकलेला चरस विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विमानतळावरील कर्मचाऱ्याला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. ओंकार मिठारी असं अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून ७१ ग्राम चरस जप्त करण्यात आलं आहे. विमानतळाच्या स्वच्छतागृहातून चरस आणण्यासाठी सांगणाऱ्या मयूर माने या तरुणाला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Kolhapur Police arrested an airport employee after he allegedly attempted to sell charas recovered from a toilet dustbin.
Wari Accident : वारीत पुन्हा भीषण अपघात, भरधाव पिकअपने वारकऱ्यांना दिली जोरात धडक

मयुर माने याचे दिल्ली येथील काही मित्र कोल्हापुरातून विमानाने दिल्लीकडे जात होते. विमानतळावरील पोलीस तपासणी पाहून माने याच्या एका मित्राने आपल्याकडील चरस विमानतळाच्या स्वच्छतागृहातील कचऱ्याच्या डब्यात टाकला आणि विमानतळात प्रवेश केल्यानंतर याची माहिती त्यांनी मयूर माने याला दिली होती. मयूर माने याने विमानतळावर काम करणाऱ्या ओमकार मिठारी याच्याशी संपर्क करून स्वच्छतागृहातून हा चरस बाहेर आणायला सांगितले. मात्र नंतर मयूर माने हा पसार झाला. त्यामुळे आपल्याकडील चरस ओंकार मिठारी याने परस्पर विकण्याचा प्रयत्न केला. मात्र या सगळ्या प्रकाराची कुणकुण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला लागताच पोलिसांनी ओंकार मिठारी सह मयूर माने याला अटक केली आहे.

Kolhapur Police arrested an airport employee after he allegedly attempted to sell charas recovered from a toilet dustbin.
ढाण्या वाघ मंत्रिमंडळात, भावी कॅबिनेट मंत्री...; धनंजय मुंडे यांच्या बॅनर्सने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग

दरम्यान विमानतळाच्या स्वच्छतागृहात चरस टाकून जाणाऱ्या युवकाचा पोलीस शोध घेत आहेत. गंभीर बाब म्हणजे विमानतळाच्या स्वच्छतागृहात टाकून जाणारा हा तरुण आणि त्याचे काही सहकारी कोल्हापुरात पैलवानकीच्या तयारीसाठी आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील वाढलेल्या अमली पदार्थाच्या वापरा सोबतच बाहेरगावाहून कोल्हापुरात पैलवानकीची तयारी करण्यासाठी येणाऱ्या मल्लांच्या वागणुकीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com