सुशील थोरात, अहिल्यानगर प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
Sant Nivruttinath Palkhi : पुण्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीत झालेला अपघाताची घटना ताजी असतानाच वारीत आणखी एक अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहिल्यानगरमध्ये भरधाव पिकअपने वारकऱ्यांना जोरात धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढलाय.
सासवडहून पंढरीच्या मार्गाने निघालेल्या माऊलांच्या दिंडीतील वारऱ्यांना जेजुरीजवळ एका भरधाव ट्रकने जोरात धडक दिली होती. यामध्ये ३ महिलांचा जगीच मृत्यू झाला होता. तर ४ महिला वारकरी गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे राज्यभरात शोककळा असतानाच अहिल्यानगरमध्ये वारीत अपघात झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात आज अपघात झाल्याची माहिती स्थानिक प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे.
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक १९ मधील वसंतराव गवते हे नगर–सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी शिवारात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये गवते यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी गवतेंना तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
संत निवृत्तीनाथ महाराजांचा हा पालखी सोहळा सोमवारी रात्री साकत गावामध्ये मुक्कामी होता. आज सकाळी पुढील प्रवासासाठी निघाल्यानंतर रुईछत्तीसी शिवारात अपघाताची ही थरारक घटना घडली. या अपघातानंतर चालक गाडी सोडून प्रसार झाला आहे. नगर तालुका पोलिसांनी जखमी वारकऱ्याला रुग्णालयात दाखल करून चालकाचा शोध घेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.