Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर क्षणात कोसळले विमान; १० जणांचा जागीच मृत्यू

Bahamas Plane Crash News : बहामासमध्ये फ्लेमिंगो एअरचे प्रवासी विमान उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणांतच कोसळले. या भीषण दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून तांत्रिक बिघाडाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
BAHAMAS PLANE CRASH: 10 DEAD AFTER FLAMINGO AIR AIRCRAFT GOES DOWN MOMENTS AFTER TAKEOFF
BAHAMAS PLANE CRASH: 10 DEAD AFTER FLAMINGO AIR AIRCRAFT GOES DOWN MOMENTS AFTER TAKEOFFSaam Tv
Published On
Summary
  • बहामासमधील नॉर्थ एंड्रॉस येथे फ्लेमिंगो एअरचे विमान कोसळले

  • भीषण अपघातात विमानातील १० जणांचा मृत्यू

  • उड्डाणानंतर काही क्षणांतच तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता

  • अपघातानंतर फ्लेमिंगो एअरच्या उड्डाणांवर तात्पुरती बंदी

बहामासमधून मोठी बातमी समोर आली आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला आहे. उड्डाण घेताच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही क्षणातच हे विमान कोसळल्याची माहिती आहे. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर बहामास सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ‘फ्लेमिंगो एअर’च्या सर्व उड्डाणांवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या अपघातामुळे मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा छोटा प्रवासी विमान अपघात नॉर्थ एंड्रॉस परिसरात झाला. हा भाग बहामासची राजधानी नसाऊच्या पश्चिमेकडे समुद्रकिनाऱ्यालगत आहे. विमान उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे काही क्षणातच हे विमान कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

BAHAMAS PLANE CRASH: 10 DEAD AFTER FLAMINGO AIR AIRCRAFT GOES DOWN MOMENTS AFTER TAKEOFF
Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

बहामासचे पंतप्रधान फिलिप ब्रेव डेविस यांनी सुरुवातीला एका व्यक्तीचा जीव वाचल्याची माहिती दिली होती. मात्र, नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले की गंभीर जखमांमुळे त्या व्यक्तीचाही मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या १० वर पोहोचली आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नसून प्रशासनाकडून ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

BAHAMAS PLANE CRASH: 10 DEAD AFTER FLAMINGO AIR AIRCRAFT GOES DOWN MOMENTS AFTER TAKEOFF
Monsoon Tips : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...

दरम्यान, अपघाताच्या पार्श्वभूमीवर ‘फ्लेमिंगो एअर’च्या उड्डाणांची सुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे. तपास पूर्ण होईपर्यंत काही उड्डाणे स्थगित ठेवली जाण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमुळे बहामासमध्ये हवाई सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com