Accident News : मुंबई -गोवा महामार्गावर भयंकर अपघात, भरधाव कारची डंपरला धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Mumbai Goa Highway Accident Update News : मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा शहराजवळ झालेल्या भीषण अपघातात डंपरला कारची जोरदार धडक बसून दोन महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
MUMBAI-GOA HIGHWAY ACCIDENT NEAR LANJA: TWO WOMEN AND CHILD KILLED IN HORRIFIC CAR-DUMPER CRASH
MUMBAI-GOA HIGHWAY ACCIDENT NEAR LANJA: TWO WOMEN AND CHILD KILLED IN HORRIFIC CAR-DUMPER CRASHSaam Tv
Published On
Summary
  • मुंबई-गोवा महामार्गावर लांजाजवळ भीषण अपघात

  • कारने पुढे जाणाऱ्या डंपरला मागून जोरदार धडक दिली

  • अपघातात दोन महिला आणि एका मुलाचा जागीच मृत्यू

  • पोलिसांचा पुढील तपास सुरु

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास गोव्यावरून मुंबईच्या दिशेला निघालेल्या एका कुटुंबाच्या भरधाव कारची डंपरला मागून धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला असून तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला आणि एका मुलाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणारे एक कुटुंब कारमधून प्रवास करत होते. लांजा शहराजवळ आल्यानंतर त्यांच्या कारची रस्त्यावर पुढे जात असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.

MUMBAI-GOA HIGHWAY ACCIDENT NEAR LANJA: TWO WOMEN AND CHILD KILLED IN HORRIFIC CAR-DUMPER CRASH
Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. स्थानिक नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गोव्यातील प्रवास आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे.

MUMBAI-GOA HIGHWAY ACCIDENT NEAR LANJA: TWO WOMEN AND CHILD KILLED IN HORRIFIC CAR-DUMPER CRASH
Health Care : मैद्याचे पदार्थ ३० दिवस खायचे बंद करा, तुमच्या शरीरावर होईल 'हा' परिणाम

कशेडी घाटात कोसळली दरड

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात धामणदिवी गावाच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरड कोसळल्यानंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून पोलिस, महसूल विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. दरड हटवण्याचे आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com