

होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
पुण्याचे हेरंब करमरकर यांचा मृत्यू
हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये थर्ड इंजिनिअर होते
जहाजावरील २४ पैकी २३ जणांची सुखरूप सुटका
होमुर्झच्या सामुद्रधुनीमध्ये पुन्हा तणाव वाढला आहे. इराणने मंगळवारी यूएईच्या २ जहाजांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला तरुण हा पुण्यातील होता. एमव्ही जीएफएस गॅलेक्सी या कंटेनर जहाजावरील थर्ड इंजिनिअर पदावर कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाजावर हल्ल्यात पुण्यामध्ये हेरंब करमरकर या अभियंत्याचा मृत्यू झाला. हेरंब करमरकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते.एमव्हीजीएफएस गॅलेक्सी या नौकेवर काम करत होते. ही नौका ओमानच्या सागरी हद्दीतुन जात असताना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास या नौकेवर हल्ला झाला.
नौकेवरील २४ पैकी २३ जणांची त्यानंतर सुटका करण्यात आली. मात्र हेरंब यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी काही मिनिटे म्हणजे रात्री २ वाजून ५० मिनिटांनी त्यांचं कुटुंबीयांसोबत शेवटचं बोलणं झालं होतं. मंगळवारी हेरंब करमरकर यांचे नातेवाईक रविंद्र टंडन यांना या घटनेबद्दल कळविण्यात आलं. हेरंब यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
दरम्यान, हेरंब करमरकर यांचा मृतदेह ओमानच्या ताब्यात असून पोस्टमॉर्टम करुन ते काम करत होते त्या गॅलेक्सी नौकेच्या कंपनीकडे सोपवला जाईल. त्यानंतर त्यांचा मृतदेह पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी आणून त्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. हेरंबच्या मृत्यूमुळ हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.