

सामुद्रधुनीवर इराणची नाकेबंदी
अमेरिकेची इराणविरोधात आक्रमक भूमिका
अमेरिकेने इराणची तब्बल ३१ जहाजे रोखली
अमेरिकने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची नाकेबंदी करायला सुरुवात केली आहे. अमेरिकेने इराणच्या ३१ जहाजांचा मार्ग रोखून धरला. खरंतर अमेरिकेने १३ एप्रिलपासून नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने इराणच्या सुमद्री व्यापारात अडथळे आणण्यास सुरुवात केली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरून कोणत्याही जहाजाला प्रवेश नसल्याचे CENTCOMने स्पष्ट केलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, CENTCOM ने स्पष्ट करत म्हटलं की, आमचा नियम केवळ पश्चिम आशियासाठी लागू नाही. तर इतर भागांसाठी देखील लागू आहे. सामुद्रधुनीवर रोखण्यात आलेल्या जहाजांमध्ये तेल टँकर आहेत. अनेक जहाज अमेरिकेच्या नियमांचं पालन करत आहे. अमेरिकेने या परिसरात मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात केले आहेत. यात १० हजार सैनिक, १०० हून अधिक लढाऊ विमान, विमानवाहू जहाजे, इतर जहाजे, ड्रोन, इंधन भरणारी विमाने, १७ हून अधिक युद्धनौकांचा समावेश आहे.
नाकेबंदीचा मोठा परिणाम हा होर्मुझ सामुद्रधुनीवर झाला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातील एक महत्वाचा मार्ग आहे. अमेरिकेने नाकेबंदी केल्याने दळणवळण मंदावली आहे. दोन्ही देशातील वाद निवळण्याची शक्यता कमी आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक सुरळीत होण्यास आणखी काही महिने लागू शकतात. याचा फटका थेट शेअर बाजारावरही होताना दिसत आहेत.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नाकेबंदीच्या आडून इराणवर आर्थिक दबाव आणण्याची रणनीती असल्याचे सांगितलं जात आहे. अमेरिकेने शस्त्रबंदीची मुदत वाढवली असली, तरी दोन्ही देशात वादावर तोडगा निघालेला नाही. यामुळे अमेरिका कडक पावले उचलण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर इराणच्या बंदरावर अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी सुरूच राहणार आहे. शस्त्रबंदीदरम्यान अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये तोडगा निघणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.