Allu Arjun Animal Review: रश्मिका- रणबीरचा ‘ॲनिमल’ पाहून 'पुष्पा' ही भारावला, दिग्दर्शक संदीप वांगाला म्हणाला...

Animal Film: 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने ‘ॲनिमल’ पाहून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं आहे.
Allu Arjun Animal Review
Allu Arjun Animal ReviewSaam Tv
Published On

Allu Arjun Animal Review

सध्या सोशल मीडियासह सर्वत्र रणबीर- रश्मिकाच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाची फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, इतर फिल्म इंडस्ट्रीतही जोरदार चर्चा होत आहे. चित्रपटाच्या कमाईचा चढता आलेख पाहता २०२३ मधील ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. सीन्स आणि डायलॉग्जवरून सर्वच स्तरातून टीका टिप्पणी होत असली तरी, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला अफलातून प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच टॉलिवूड अभिनेता आणि 'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनने (Allu Arjun) ‘ॲनिमल’ पाहून चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं भरभरुन कौतुक केलं आहे.

Allu Arjun Animal Review
Piyush Ranade Interview: सुरुचीसोबत लग्न केल्यानंतर पियुषची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “चांगल्या आणि वाईट काळात...”

अभिनेता अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत ‘ॲनिमल’मधील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत अल्लू अर्जुन म्हणाला, “ ‘ॲनिमल’ चित्रपटा पाहून मी थक्क झालो. अभिनंदन. या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीर कपूरने आपल्या अभिनयाची भारतीय सिनेसृष्टीमध्ये, स्वत:चा वेगळाच परफॉर्मन्स करुन दाखवला आहे. तुझं काम प्रेरणादायी आहे. तुझं काम पाहून आणि तुझ्या अभिनयाची जादू पाहून मी नि:शब्द झालोय. रश्मिका मंदान्ना, खूप सुंदर आणि अप्रतिम. तुझा आतापर्यंतचा उत्तम परफॉर्मन्स.”

Allu Arjun Story
Allu Arjun StoryInstagram

बॉबी देओलच्या इम्पॅक्टफुल परफॉर्मन्सने सर्वांनाच नि:शब्द केलंय. तुमचा खूप आदर वाटतो. अनिल कपूरजी तुमचाही चित्रपटामध्ये, सहज आणि सुंदर अभिनय आहे. तुमचा अनुभवच सर्वकाही सांगून जातो. तृप्ती डिमरीनेही सगळ्यांच्याच मनावर राज्य केलं आहे. कायमच तू प्रेक्षकांचे मन जिंक. सर्वच Artist आणि Techniciansने उत्तम काम केलंय. सोबतच दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा.. तू तर सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. तुझ्या कामाची तुलनाच होऊ शकत नाही. तू पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी केली आहे. तुझ्या चित्रपटांमुळे भारतीय सिनेसृष्टीचा चेहरामोहराच बदलणार आहे. ‘ॲनिमल’ने भारतीय सिनेमांच्या यादीतील क्लासिक सिनेमात प्रवेश केलाय.” अशी इन्स्टाग्राम स्टोरी अल्लू अर्जुनने शेअर केली आहे.

Allu Arjun Animal Review
Actress Leelavathi Dies: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ६०० हून अधिक चित्रपटात केलं होतं काम; पंतप्रधानांनीही व्यक्त केला शोक

‘ॲनिमल’ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपट १ डिसेंबरला रिलीज झाला असून चित्रपटाने आठव्या दिवसापर्यंत ६००.६७ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत रणबीर कपूरसोबत रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर आहेत. चित्रपटाची निर्मिती जवळपास १०० कोटींमध्ये झाली असून पहिल्या दोन दिवसांच्या कमाईतूनच चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च वसूल झाला आहे. (Entertainment News)

Allu Arjun Animal Review
Animal Controversy Reach Parliament: ‘ॲनिमल’ चित्रपटाचा वाद संसदेत, 'त्या' सीनवरून महिला खासदार संतापल्या; नेमकं काय घडलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com