Animal Controversy Reach Parliament: ‘ॲनिमल’ चित्रपटाचा वाद संसदेत, 'त्या' सीनवरून महिला खासदार संतापल्या; नेमकं काय घडलं?

Animal Film Dispute: छत्तीसगडच्या काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन यांनी रश्मिका- रणबीरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटातील कंटेटवरून टीका टीप्पणी केली आहे.
MP Ranjeet Ranjan On Animal Film
MP Ranjeet Ranjan On Animal FilmSaam Tv
Published On

MP Ranjeet Ranjan On Animal Film

संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित ‘ॲनिमल’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला आहे. एका चित्रपटातील सीन्स आणि डायलॉग्जवरून टीका टिप्पणी होत असताना चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करताना दिसत आहे.

ॲक्शन, ड्रामा, क्राइम, इंटिमेट सीन्समुळे चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. छत्तीसगडच्या काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन यांनी रश्मिका- रणबीरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटातील कंटेटवरून टीका टीप्पणी केली आहे.

इतकंच नाही तर, चित्रपट पाहिल्यानंतर माझी मुलगी थिएटरमधून रडत बाहेर आली, संसदेमध्ये बोलत असताना असं कॉंग्रेसच्या महिला खासदारांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

MP Ranjeet Ranjan On Animal Film
Nayak 2: 'नायक'च्या सीक्वेलबद्दल अनिल कपूर यांचा मोठा खुलासा, सोशल मीडियावर दिली हिंट

संसदेमध्ये छत्तीसगडच्या काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन म्हणाल्या, “चित्रपट हा समाजाचा आरसा आहे. आपण चित्रपटपाहूनच लहानाचे मोठे झालोय. आजकालच्या तरुणाईवर चित्रपटाचा खूप प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. ‘कबीर’, ‘पुष्पा’ आणि नुकताच रिलीज झालेला ‘ॲनिमल’ या चित्रपटातून सध्याच्या तरुणांना काय मिळतंय शिकायला? माझ्या मुलीचा कॉलेजमध्ये खूप मोठा फ्रेंड सर्कल आहे. ती त्यांच्यासोबत ‘ॲनिमल’ चित्रपट पाहायला गेली. तिला हा चित्रपट पाहताना रडू कोसळलं. ती मधूनच रडत रडत बाहेर आली.”

“चित्रपटामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसा दाखवण्यात आली आहे. अशा गोष्टी चित्रपटामध्ये दाखवणं मला योग्य वाटत नाही. 'कबीर सिंग' बघा, तो त्याच्या पत्नीसोबत आणि समाजातल्या लोकांसोबत कसा वागतो, ते योग्य पद्धतीने चित्रपटामध्ये दाखवले आहे. हा विचार करायला लावणारा विषय आहे. या चित्रपटांचा आणि त्यातल्या भूमिकांचा आपल्या मुलांवर परिणाम होत आहे. मुलं चुकीच्या भूमिकांना स्वत:चा आदर्श मानत आहेत. अशा गोष्टी आपण चित्रपटांमध्ये पाहत आहे, म्हणूनच समाजामध्ये, अशा पद्धतीची हिंसा दिसत आहे.” अशा शब्दांत त्यांनी संसदेमध्ये आपला संताप व्यक्त केला आहे.

MP Ranjeet Ranjan On Animal Film
Lakshmika Sajeevan Died: साउथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का; २४ वर्षीय अभिनेत्रीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

‘ॲनिमल’ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपट १ डिसेंबरला रिलीज झाला असून चित्रपटाने एका आठवड्यामध्ये, ५६३ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसोबत रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर आहेत. चित्रपटाची निर्मिती जवळपास १०० कोटींमध्ये झालेली असून पहिल्या दोन दिवसांच्या कमाईतूनच निर्मितीचा खर्च वसूल झाला आहे. (Entertainment News)

MP Ranjeet Ranjan On Animal Film
Animal Worldwide Collection: बॉक्स ऑफिसह जगभरात 'अ‍ॅनिमल'ची हवा , कमाईमध्ये 'पठान'-'जवान' आणि 'गदर २' चा मोडला रेकॉर्ड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com