सध्या बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आपल्या अभिनयामुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. ‘ॲनिमल’मध्ये मुख्य भूमिकेत असलेले अनिल कपूर आता आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आले आहे. ‘ॲनिमल’नंतर अनिल कपूर यांच्या ‘नायक’ चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा होत आहे. नुकतंच सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल महत्वाची अपडेट दिली आहे.
एस शंकर दिग्दर्शित ‘नायक’ चित्रपट २००१ मध्ये बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. चित्रपटामध्ये, अनिल कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तब्बल २३ वर्षांच्या मोठ्या काळानंतर अनिल कपूर यांच्या ‘नायक’ चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा सुरु आहे. नुकतंच अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर त्यांचा आणि बॉबी देओलचा एक शर्टलेस फोटो शेअर केला होता. या फोटोवर एका चाहत्याने ‘नायक २’ बनवा अशी विनंती केली आहे. आणि त्यावर अभिनेता अनिल कपूरने उत्तर देत सर्वांचेच लक्ष वेधले.
दरम्यान, ‘नायक’ विषयी सांगायचे तर, एस शंकर दिग्दर्शित ‘नायक’ चित्रपट २००१ मध्ये बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. चित्रपटामध्ये, अनिल कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. चित्रपटामध्ये अनिल कपूरने एक दिवस मुख्यमंत्री बनून सर्वच प्रेक्षकांचे मने जिंकले. चित्रपटात अनिल कपूरसोबत राणी मुखर्जी, परेश रावल आणि अमरीश पुरी हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. ‘नायक’चे निर्माते आणि दिग्दर्शक लवकरच ‘नायक २’ ची घोषणा करण्याची शक्यता आहे. अद्याप चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अनिल कपूरच्या कामाबद्दल बोलायचे तर, सध्या अनिल कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘ॲनिमल’ची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपट १ डिसेंबरला रिलीज झाला असून चित्रपटाने आतातब्बल एका आठवड्यामध्ये, ५६३ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाने 'जवान', 'पठान' आणि आता 'गदर २' चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रणबीर कपूरसह, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि अनिल कपूर आहेत. सर्वच कलाकारांच्या अभिनयाने आणि लूकने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. चित्रपटाची निर्मिती जवळपास १०० कोटींमध्ये झालेली असून पहिल्या दोन दिवसांच्या कमाईतूनच निर्मितीचा खर्च वसूल झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.