मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांना आता सुरुवात झाली आहे. या राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेससह भाजपने सर्वस्व पणाला लावलं आहे. आज मध्य प्रदेशच्या २३० जागा आणि छत्तीसगडमधील उर्वरित ७० जागांसाठी मतदान होणार आहे. मतदार कुणाला कौल देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात ७ नोव्हेंबरला नक्षलग्रस्त भागांमधील २० जागांवर मतदान झाले होते. निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर महादेव बेटींग अॅपवरून गंभीर आरोप झाले होते. मात्र, त्यामुळं ही निवडणूक चांगली गाजताना पाहायला मिळत आहे.
आता दुसऱ्या टप्प्यातील ७० जागांसाठी एकूण ९५८ उमेदवार रिंगणात आहे. यामध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल, उपमुख्यमंत्री टी एस सिंग देव, राज्यातील ८ मंत्री असे मातबर रिंगणात आहेत. २०१८ मध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आली होती. यावेळीही राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करण्याची काँग्रेस नेत्यांना अपेक्षा आहे.
दुसरीकडे मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये चुरस आहे. गेल्या वेळी मिळवलेली आणि दीड वर्षांत पुन्हा गमावलेली सत्ता परत मिळण्यासाठी काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावली आहे.
भाजपच्या प्रचाराची धुरा मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री चौहान यांनी सांभाळली. काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.