maharashtra state transport corporation 328 crores revenue in 15 days diwali season
maharashtra state transport corporation 328 crores revenue in 15 days diwali season St Bus New and update - Saam tv

ST Bus Revenue: दिवाळीत एसटी महामंडळ मालामाल, १५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी; कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी आनंद

MSRTC Revenue Diwali Season: राज्यातील प्रवाशांची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला ऐन दिवाळीत मोठा धनलाभ झाला आहे.

MSRTC Revenue Diwali Season

राज्यातील प्रवाशांची लालपरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीला ऐन दिवाळीत मोठा धनलाभ झाला आहे. गेल्या १५ दिवसात एसटी महामंडळाने तब्बल ३३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हंगामी दरवाढ करूनही अनेक प्रवाशांनी एसटी बसलाच पसंती दिली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

maharashtra state transport corporation 328 crores revenue in 15 days diwali season
Thackeray Group Vs Shinde Group: ' स्मृतीदिन गालबोट लागायला नको म्हणून आम्ही', पार्कातील राड्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले...

अजूनही या कमाईत मोठी वाढ होऊ शकते, असं महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि त्यानंतर एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते.

त्यातच मराठा आंदोलनाचा फटकाही एसटीला बसला होता. अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी बसेसची तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे काही दिवस एसटी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे महामंडळाचे (MSRTC) कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले होते. मात्र, दिवाळीत एसटीने मोठी कमाई केली आहे.

एसटीवर आलेलं आर्थिक संकट पाहता काही दिवसांपूर्वी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सूत्रानुसार यंदाच्या दिवाळीच्या हंगामात सर्व गाडय़ांच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ होती. मात्र, भाडेवाढ होऊनही अनेक प्रवाशांनी एसटीनेच प्रवास करण्यास पसंती दिली.

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत एसटीला राज्यभरातून ३२८ कोटी ४० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. विशेष बाब म्हणजे यातील ३१ कोटी ६० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न भाऊबीजेच्या दिवशी मिळाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

maharashtra state transport corporation 328 crores revenue in 15 days diwali season
Aditya Thackeray Video: पार्कात शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिला इशारा, म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com