मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांचा मोठा राडा झाला. या प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंनी प्रतिक्रिया दिलीय. झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे. आज आमचे कार्यकर्ते दर्शन घेऊन जात असताना उबाटा म्हणजेच ठाकरे गटाचे कार्यकर्ते तेथे आले. त्यांनी काहीही कारण नसताना तेथे घोषणाबाजी केल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. (Latest News)
परंतु बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी कोणतेही गालबोट लागू, नये यासाठी कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलंय यावेळी केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवाद केल्यानंतर ते येथून निघाले. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते तेथे आले होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यानंतर दोन्ही गटात वाद झाला. दोन्ही गटातील वादावादी वाढल्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई पोहोचले. त्यांच्यासोबतच मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे नेते येथे दाखल झाले . त्यानंतर शिंदे गटाचे नेतेही तेथे आले. दरम्यान या वादाचे व्हिडिओ व्हायरल झाले असून यात शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रेही दिसत आहेत. यात म्हात्रे खूपच आक्रमक झाल्याचं दिसत आहेत. दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडल्यानंतर दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत. राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया याप्रकरणी येत आहेत.
शिवाजी पार्कातील राड्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिलीय. उबाटाच्या कार्यकर्त्यांनी उगाच वाद सुरू केल्याचे शिंदे म्हणाले. बाळासाहेबाच्या दिनाला कोणत्याही वाद नको, कोणतं गालबोट नको यासाठी आम्ही आदल्या दिवशी स्मृतीस्थळी जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतो. नतमस्तक होतो. यासाठी मी आज आमदार आणि खासदार, पदाधिकाऱ्यासोबत तेथे जाऊन दर्शन घेतलं. .
त्यानंतर आम्ही शांतपणे तेथून निघालो, आमचे कार्यकर्तेही दर्शन घेऊन निघत होते. परंतु काही कारण नसताना, उबाटा म्हणजे ठाकरे गटाचे लोक तेथे येऊन उगाच तेथे घोषणाबाजी करत होते. त्यानंतर वाद घातला आणि गालबोट लावणं हे अशोभनीय आहे. तरीही बाळासाहेबांच्या स्मृतीदिन गालबोट लागायला नो म्हणून मी कार्यकर्त्यांना आवाहन आणि विनंती करतो, कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, असं वर्तन करावं. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी साम टीव्हीला दिलीय
दरम्यान मुंब्र्यामध्ये ठाकरे गटाची शाखा तोडल्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे त्या ठिकाणी पोहोचले होते. मात्र त्यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आणि त्यांना शाखेकडे न जाताच माघारी परतावं लागलं होतं. यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे येथे आल्याने त्यांना विरोध म्हणून ठाकरे कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने आले होते, असं सांगितलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.