Aditya Thackeray Video: पार्कात शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिला इशारा, म्हणाले...

Shivaji Park Rada: पार्कात शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिला इशारा, म्हणाले...
Aditya Thackeray News
Aditya Thackeray NewsSaam Tv
Published On

Aditya Thackeray On CM Eknath Shinde:

शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले असून दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. शेकडोच्या संख्येने दोन्ही गटाचे कार्यकर्ते तिथे जमले आहेत.

यावर आपली प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले की, ''ही दुर्दैवी घटना आहे. जे पक्ष चोरणारे लोक आहेत, यांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा काहीही अधिकार नाही आहे. त्यांनी त्यांचं नाव आणि फोटो वापरून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. पण मी पहिल्यापासून बोलत आहे, पाच महिने झालं नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन झालं नाही.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Aditya Thackeray News
Thackeray Group Vs Shinde Group: बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर राडा, शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने; शीतल म्हात्रे संतापल्या...

आदित्य ठाकरे म्हणाले की, ''त्यांना स्वतःचा प्रचार करायला वेळ आहे. मात्र जनतेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ते महाराष्ट्रात वातावरण बिघडवून दंगली घडवत आहेत. हे सगळं शिंदे सरकारच्या नावाने सुरु आहे, त्यांना आम्ही लवकरच पळून लावणार.'' (Latest Marathi News)

मुख्यमंत्री आले असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली, असा आरोप केला जात आहे. असा प्रश्न त्यांना विचारला असताना ते म्हणाले की, ''ज्यांना वाटलं असेल की, गद्दार लोक तिथे येऊ नये, त्यांनी घोषणा दिल्या असतील. त्यात चुकीचं काय आहे?''

Aditya Thackeray News
Narhari Zirwal Viral Video: विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका, पाहा VIDEO

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ''मुंब्रा आणि बांद्रामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती, ती शाखा तोडली आणि बाळासाहेब यांच्या फोटोवर हातोडा चालवला. त्यांना काय अधिकार आहे तिथे जाण्याचा? यापुढे महाराष्ट्र त्यांना (शिंदे गटाला) दणक्यात उत्तर देणार आहे. निवडणूक लावण्याची त्यांच्यात हिम्मत नाही. निवडणूक लावल्यास त्यांना उत्तर मिळणार.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com