Narhari Zirwal Viral Video
Narhari Zirwal Viral VideoSaam TV

Narhari Zirwal Viral Video: विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका, पाहा VIDEO

Narhari Zirwal News : विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी आदिवासी नृत्यावर धरला ठेका, पाहा VIDEO
Published on

>> तबरेझ शेख

Narhari Zirwal Viral Video:

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे आदिवासी पारंपारिक गाण्यावर नृत्य करतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. दिवाळीच्या काळात आदिवासी गाण्यावर नृत्य करतानाचा झिरवाळ यांचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हा व्हिडिओ झिरवाळ यांच्या पेठ मतदारसंघातील हरणगाव येथील असून, दिवाळी पाडव्यानिमित्त या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी रावणताठी नाचवली. याचा व्हिडियो त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केला असून, हा व्हिडिओ व्हायरल होतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Narhari Zirwal Viral Video
National Politics News: 12000 कोटींचे विमान आणि 12 कोटींची कार; अमेरिका ते अदानींपर्यंत, राहुल गांधींनी PM मोदींना केलं लक्ष्य

या अगोदर देखील नरहरी झिरवाळ यांचे पारंपारिक पद्धतीने नाचण्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. त्याचप्रमाणे आता पुन्हा एकदा दिवाळी निमित्ताने नरहरी झिरवाळ यांचे नृत्य व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

आदिवासी गाण्यावर नवनीत राणांनी धरला ठेका

दरम्यान, याआधी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनीही आदिवासी मुलांसोबत नृत्य करतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओत नवनीत राणा यांनी आदिवासी गाण्यावर चांगलाच ठेका धरला होता. व्हिडीओमध्ये त्या आदिवासी मुलांसोबत पारंपरिक नृत्य करताना दिसल्या.

Narhari Zirwal Viral Video
Navi Mumbai Metro: नवी मुंबईकरांची उद्या स्वप्नपूर्ती! बेलापूर-पेणधर मार्गावर धावणार मेट्रो; किती असेल तिकीट? जाणून घ्या

हा व्हिडिओ अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी येथील आहे. धारणी येथे राणा दाम्पत्याच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी दहीहंडीच्या कार्यक्रमात आदिवासी मुलांनी नृत्य केलं. मुलांना नृ्त्य करताना बघून नवनीत राणा यांनाही मोह आवरला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com