नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उद्यापासून नवी मुंबईच्या बेलापूर ते पेणधर मार्गावर मेट्रो धावणार आहे. यामुळे नवी मुंबईतील नागरिकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तब्बल 14 वर्ष येथील नागरिक मेट्रोच्या प्रतीक्षेत होते. अखेर ही मेट्रो सेवा सुरु होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेणधर या मार्ग क्र. १ वर शुक्रवारपासून औपचोरिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
याचबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका निवेदनात म्हणाले आहेत की, “१७ नोव्हेंबर २०२३ पासून नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. १ वरील बेलापूर ते पेणधर दरम्यान मेट्रो सेवा सुरू होत असून नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे. मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार असून सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोड्सना मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहर या लौकिकाला साजेशी उत्तम आणि सक्षम परिवहन व्यवस्था मेट्रोद्वारे निर्माण होणार आहे.” (Latest Marathi News)
किती स्थानकांवर थांबणार?
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईमधील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग विकसित करण्यात येत असून सिडकोतर्फे आधी बेलापूर ते पेंधर या ११.१० किमी लांबीच्या मार्ग क्र. १ चे काम हाती घेण्यात आले होते. या मार्गावर एकूण ११ स्थानकांसह तळोजा पंचनंद येथे आगार (डेपो) आहे.
मेट्रोचं वेळापत्रक
ही मेट्रो सेवा १७ नोव्हेंबर २०२३ रोजी पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान दुपारी ३.०० वाजता सुरू होऊन शेवटची फेरी ही रात्री १०.०० वाजता असणार आहे. तसेच १८ नोव्हेंबर २०२३ पासून पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान सकाळी ०६.०० वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री १०.०० वाजता होणार आहे. मार्ग क्र. १ वर दर १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.
किती असेल तिकिटाचे दर?
बेलापूर ते पेणधर मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या तिकीटाचे दर हे अंतरानुसार पुढीलप्रमाणे असणार आहेत – ० ते २ किमीच्या टप्प्याकरिता रु. १०, २ ते ४ किमीकरिता रु. १५, ४ ते ६ किमीकरिता रु. २०, ६ ते ८ किमीकरिता रु. २५, ८ ते १० किमीकरिता रु. ३० आणि १० किमीपुढील अंतराकरिता रु. ४०.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.