सागर निकवाडे, प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस आज नंदुबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदेंनी हजेरी लावली. यावेळी आदिवासी बांधवांना संबोधित करताना सरकार आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
"स्वातंत्र काळानंतर कधीही जनजाती बांधवांना उच्च पद मिळालं नव्हते. मात्र देशाचे पंतप्रधान मोदी यांनी एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती केले. आज आपण जो स्वतंत्रता महोत्सव साजरा करत आहोत तो फक्त आणि फक्त भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्यामुळेच असे म्हणत सरकार आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
"आज पासून तीन दिवसीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं नियोजन आपण करीत आहोत. आश्रम शाळांची बळकटी करणाचे काम आपण करत आहोत. आदिवासी बांधवांचे वन हक्के दावे लवकरात लवकर मंजूर करण्यात येत आहेत." तसेच नंदूरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेच्या समस्या दूर करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे....
राज्यपाल रमेश बैस यांच्याकडूही मोदींचे कौतुक...
कार्यक्रमात बोलताना "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पहिल्यांदा जनजातीय समाजाला न्याय आणि सन्मान देण्याचे काम झाल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. तसेच आज अनेक योजनांचे लोकार्पण मोदींनी केले असून, भारत सरकार आणि राज्य सरकार आदिवासी बांधवाना सक्षम करण्यासाठी काम करीत आहेत.. असे ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.