Actress Leelavathi Dies: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ६०० हून अधिक चित्रपटात केलं होतं काम; पंतप्रधानांनीही व्यक्त केला शोक

Actress Leelavathi Death: कन्नड अभिनेत्री लीलावती यांचे निधन झाले आहे. त्यांनी फक्त कन्नड सिनेसृष्टीमध्येच नाही तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
Actress Leelavathi Dies
Actress Leelavathi DiesTwitter
Published On

Actress Leelavathi Passed Away

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. कन्नड अभिनेत्री लीलावती यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांनी फक्त कन्नड सिनेसृष्टीमध्येच नाही तर, बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लीलावती यांना वयोमानानुसार काही आजार झाले होते. त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. लीलावतींनी ६०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. दरम्यान, अभिनेत्री मुलगा विनोद राजसोबत नेलमंगला येथे राहत होत्या. (Tollywood)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Actress Leelavathi Dies
Animal Controversy Reach Parliament: ‘ॲनिमल’ चित्रपटाचा वाद संसदेत, 'त्या' सीनवरून महिला खासदार संतापल्या; नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)च्या माध्यमातून अभिनेत्री लीलावती यांच्या निधनाबद्दल शोकव्यक्त केला आहे. “दिग्गज कन्नड चित्रपट अभिनेत्री लीलावती जी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. चित्रपटसृष्टीची खरी ओळख असलेल्या लीलावती यांनी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अष्टपैलू अभिनयाने रुपेरी पडद्यावर आपले नाव कोरले. त्यांच्या भूमिका आणि उल्लेखनीय कामगिरी नेहमीच लक्षात राहिल आणि त्यांचे कौतुक होईल. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांप्रती कायमच राहिल. ओम शांती....” असं पंतप्रधानांनी ट्वीट केले.

Actress Leelavathi Dies
Nayak 2: 'नायक'च्या सीक्वेलबद्दल अनिल कपूर यांचा मोठा खुलासा, सोशल मीडियावर दिली हिंट

कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)च्या माध्यमातून अभिनेत्री लीलावती यांच्या निधनाबद्दल शोकव्यक्त केला आहे. 'गेल्या आठवड्यातच त्यांच्या आजारपणाबद्दल ऐकल्यानंतर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. लीलावती यांचा मुलगा अभिनेता विनोद राज यांच्याकडे लीलावती यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, ओम शांती...' माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, बसवराज बोम्मई आणि एचडी कुमारस्वामी यांनीही लीलावती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com