Karnataka News: सिद्धरामय्या सरकारची वचनपूर्ती; कर्नाटकमधील महिलांना दिली मोठी भेट! काय आहे शक्ती योजना?

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करताच कॉंग्रेस (Congress) सरकारने जनतेला दिलेली वचने पुर्ण करण्याचा धडाका लावला आहे.
Karnataka News
Karnataka News Saamtv
Published On

Karnataka Government New Scheme: कर्नाटक सरकारने आजपासून राज्यात महिलांना एसटी सेवा मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आजपासून शक्ती योजना राज्यभरात लागू केली आहे, ज्या अंतर्गत महिला आजपासून मोफत बसचा प्रवास करु शकतील. या योजनेमुळे कर्नाटकातील महिलांचा प्रवास सुखकर होणार आहे. (Karnataka News)

Karnataka News
Pandharpur Wari 2024 : वारकऱ्यांच्या सोईसुविधांसाठी प्रशासन सज्ज, उष्माघात टाळण्यासाठी पहिल्यांदाच पंढरपुरात स्प्रिंकलरचा वापर

काय आहे शक्ति योजना...

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करताच कॉंग्रेस (Congress) सरकारने जनतेला दिलेली वचने पुर्ण करण्याचा धडाका लावला आहे. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यामध्ये महिलांसाठी मोफत बस प्रवास, मोफत वीज यासह पाच आश्वासने दिली होती. विजयानतर सिद्धरामय्या यांचं सरकार येताच त्यांनी वचनपूर्ती केली आहे.

या योजनेअंतर्गत महिलांना राज्यांतर्गत फक्त 20 किमीपर्यंतच मोफत प्रवास करता येईल. महिलांसह तृतीयपंथीयांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महागाईने त्रस्त असलेल्या महिला वर्गाला या निर्णायामुळे मोठा दिलासा मिळणर आहे. (Latest Marathi News)

Karnataka News
Supriya Sule On Political leaders: पक्ष बदलणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचा सल्ला; जिथे जाल तिथं...

काय आहेत नियम....

याबद्दलचे नियम सांगताना मुख्यमंत्री सिद्धरामैय्या (Siddhramaih) यांनी ही योजना आंतरराज्यीय प्रवास करायचा असल्यास लागू होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच एसी आणि वोल्वो बस वगळता सर्व बसमध्ये ही योजना लागू होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच शेजारच्या राज्यातून २० किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या महिलांसाठीही ही योजना लागू होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com