सचिन जाधव
Pune News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशात १६ आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. या सर्व परिस्थितीत अजून अनेक पदाधीकारी पक्ष बदलत आहेत. अशा सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आपल्या स्टाईलने कानउघाडणी करत मोलाचा सल्ला दिला आहे. (Latest Political News)
खासदार सुप्रिया सुळे आज बारामती लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर आहेत. यावेळी जांभूळवाडी तलाव व कात्रज तलावाची त्यांनी पहाणी केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, पुणे महापालिका आणि इरिगेशन खातं यांची तातडीने बैठक घेऊन प्रश्न सोडवले पाहिजेत. महापालिका निवडणूक लवकर घेतली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केलीये.
महापालिका हलगर्जीपणा करत आहे बाकी काही नाही. राज्यात जे काही होत ते राष्ट्रवादीमुळे होतं आहे, असं काही जण म्हणतात. त्यामुळे राज्यात सत्ता कोणाची आहे ते कळत नाही, असा टोला सुप्रिय सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.
पक्ष बदलणाऱ्यांना मोलाचा सल्ला
राज्याच्या राजकारणात शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट पडले आहेत. यासह बरेच नेते मंडळी आपला पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करतायत. मात्र यामुळे मुळ पक्षाचे नुकसाना होते. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी यावर म्हटलं आहे की, दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांनी जिथं जातील तिथं चांगल्या प्रकारे नांदावं. त्या पक्षाततरी चांगल्या पद्धतीने वागावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीसांनी पवारांना कॉम्प्लेमेंट दिली
टीआरपी कसा वाढवावा हे शरद पवारांकडून शिका, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात म्हटलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्यात की,फडणवीसांनी पवारांना ही मोठी कॉम्प्लेमेंट दिली आहे. शरद पवार यांचे पुस्तक निट वाचा. त्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टी आहेत. उद्धव ठाकरेंबद्दल देखील काही चांगल्या गोष्टी आहेत.
म्हणून आम्ही विरोधक आहोत
आम्ही संविधान मानणारे आहोत त्यामुळे विरोधकही आहोत. समसमान जागावाटप यावर राऊत काय बोलले ते मला माहिती नाही. मात्र आम्ही दडपशाही वाले नाही आम्ही लोकशाही वाले आहोत त्यामुळे विरोधक आहोत. ओरिजनल भाजप संवेदनशील होती. आता तसे पाहायला मिळत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच त्यांनी बैलगाडा शर्यतीचे स्वागत केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.