Laila Khan Case Verdict : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट; सावत्र बापाला मृत्युदंडाची शिक्षा

Laila Khan Family Killing Case : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात तब्बल १३ वर्षानंतर मुंबईच्या सत्र न्यायालयाने लैलाच्या सावत्र वडिलांना या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Laila Khan : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट;  तिसऱ्या बापाला मृत्यूदंडाची शिक्षा
Laila Khan Family Killing CaseSaam Tv

फेब्रुवारी २०११ साली अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांची इगतपुरी येथील फार्म हाऊसवर हत्या झाली होती. हत्या केल्यानंतर इगतपुरीमध्ये असलेल्या फार्महाऊसवर खड्ड्यात त्यांचे मृतदेह पुरण्यात आले होते. मात्र हत्येच्या तब्बल १३ वर्षानंतर मुंबईच्या सत्र न्यायालयाने लैलाच्या सावत्र वडिलांना या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे.. मे महिन्याच्या सुरुवातीला न्यायालयाने परवेझ टाक याला खून आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

Laila Khan : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट;  तिसऱ्या बापाला मृत्यूदंडाची शिक्षा
Akhil Bharatiya Marathi Natya Parishad : अशोक सराफ आणि रोहिनी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदकडून घोषणा

गेल्या आठवड्यात सरकारी वकील पंकज चव्हाण यांनी हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्यामुळे दोषी परवेझला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. हा नियोजित खून असल्याचे सरकारी वकीलांनी सांगितले आहे. हिंसाचाराचे क्रूर कृत्य करण्यात आले आणि एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.

Laila Khan : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट;  तिसऱ्या बापाला मृत्यूदंडाची शिक्षा
SRK Hospital Discharged : शाहरुख खानला रुग्णालयातून डिस्चार्ज, अहमदाबादहून थेट मुंबई गाठली; IPL फायनलला हजेरी लावणार का?

आरोपी परवेझ टाका हे लैलाच्या आईचे तिसरे पती होते. लैला आणि तिची आई आणि लैलाचे चार भांवडं आणि त्यांची अजून एक नातेवाईक फेब्रुवारी २०११मध्ये काही दिवस बेपत्ता होते. ते बेपत्ता झाल्यानंतर लैलाच्या वडिलांना मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यात अभिनेत्री लैला तिच्या कामानिमित्ताने जम्मू किंवा काश्मीरमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यासोबतच ती तिच्या पतीसोबत दुबईत असेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

Laila Khan : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट;  तिसऱ्या बापाला मृत्यूदंडाची शिक्षा
Shruti Haasan : श्रुती हासन आणि शांतनु हजारिकाचा ब्रेकअप; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मी पूर्णपणे सिंगल…”

आरोपी परवेज याने दुबई येथील व्यावसायिकाशी झालेल्या व्यावसायिक करारात हिस्सा न दिल्याने रागाच्या भरात हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. या हत्येप्रकरणी जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाडमधील रोड कॉन्ट्रेक्टर आणि लैलाच्या आईचा तिसरा पती हे मुख्य संशयित आहेत.

८ फेब्रुवारी २०११ मध्ये इगतपुरी मधील फार्महाऊसवर सर्वांची हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेने २०१२ मध्ये इगतपुरी येथील फार्महाऊसमधील खड्ड्यातून सहा सांगाडे जप्त केले होते. या गुन्ह्याप्रकरणी ३ ऑक्टोबर २०१२ रोजी गुन्हे शाखेने आरोपी टाक आणि या गुन्ह्यातील फरार आरोपी शाकीर हुसेन यांच्यावर हत्या आणि अपहरण अन्वये गुन्हा दाखल केला होता.

Laila Khan : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट;  तिसऱ्या बापाला मृत्यूदंडाची शिक्षा
Adinath Kothare : बँकेचे हफ्ते थकले अन् मुंबईत बेघर झालो...; आदिनाथ कोठारेने सांगितला कुटुंबावर ओढावलेला वाईट काळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com