Mumbai News: अभिनेत्री लैला हत्याकांडाचा १२ वर्षांनी उलगडा; सावत्र बापच निघाला मारेकरी, काय आहे प्रकरण?

Crime News: फेब्रुवारी २०११ साली अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांची इगतपुरी येथील फार्म हाऊसवर हत्या झाली होती .
Mumbai News
Mumbai NewsCanva

फेब्रुवारी २०११ साली अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच जणांची इगतपुरी येथील फार्म हाऊसवर हत्या झाली होती . हत्या केल्यानंतर त्यांच्या इगतपुरीमध्ये असलेल्या फार्महाऊसवरील खड्ड्यात त्यांचे मृतदेह पुरण्यात आले होते. मात्र हत्येच्या तब्बल १३ वर्षानंतर आरोपीला सत्र न्यायालयाने लैलाच्या सावत्र वडिलांना या प्रकरणी दोषी ठरवले आहे.

Mumbai News
Akola Crime News: प्रेमात अडसर ठरत होती बायको; नवऱ्याने गाठला विकृतीचा कळस, मित्राच्या मदतीने बनवले अश्लील व्हिडिओ

२०११

आरोपी परवेझ हे लैलाच्या आईचे तिसरे पती होते. फेब्रुवारी 2011 लैला आणि तिची आई आणि तिचे चार भांवडे आणि त्यांची अजून एक नातेवाईक हे २०११ मध्ये काही दिवस बेपत्ता होते, त्यांच्या बेपत्ता झाल्यानंतर लैलाच्या वडिलांना मुंबईच्या ओशिवर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यात अभिनेत्री लैला तिच्या कामानिमित्ताने जम्मू किंवा काश्मीरमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला शिवाय ती तिच्या पतीसब दुबईत(Dubai) असेल असाही अंदाज व्यक्त करण्यात आला.

पोलिसांचा अदांज...

आरोपी परवेज याने दुबई येथील व्यावसायिकाशी झालेल्या व्यावसायिक करारात हिस्सा न दिल्याने रागाच्या भरात हत्या केल्याचा अंदाज आहे. या हत्येप्रकरणी जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाडमधील रस्ता कंत्राटदार आणि खानच्या आईचा तिसरा पती हे मुख्य संशयित आहेत. ८ फेब्रुवारी २०११ मध्ये इगतपुरी (igatpuri)येथील त्यांच्या कुटुंबाच्या फार्महाऊसवर सर्वांची हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेने २०१२ मध्ये इगतपुरी येथील फार्महाऊसमधील खड्ड्यातून सहा सांगाडे जप्त केले होते.

या गुन्ह्याप्रकरणी ३ ऑक्टोबर २०१२ रोजी गुन्हे शाखेने आरोपी परवेझ आणि या गुन्ह्यातीस फरार आरोपी शाकीर हुसेन यांच्यावर हत्या आणि अपहरण या अन्वये गुन्हा दाखल केला आहे.शिवाय मंगळवारी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. आरोपी परवेझ टाकला जास्तीत जास्त फाशी तर कमीत कमी जन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.

Mumbai News
Wardha Crime News : नवऱ्याला मध्यरात्रीच संपवलं; बायकोनं बनाव रचला, रिपोर्ट आला अन् बिंग फुटलं!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com