Shruti Haasan : श्रुती हासन आणि शांतनु हजारिकाचा ब्रेकअप; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मी पूर्णपणे सिंगल…”

Shruti Haasan Confirms Breakup With Santanu Hazarika : खुद्द श्रुती हासननेच ‘Ask Me Anything’ या सेशनमध्ये एका चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देत ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे.
Shruti Haasan Confirms Breakup With Santanu Hazarika
Shruti Haasan Confirms Breakup With Santanu HazarikaSaam Tv

टॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपरस्टार कमल हासन यांची लेक अभिनेत्री श्रुती हासन आणि बॉयफ्रेंड शांतनू हजारिकाचा काही दिवसांपूर्वीच ब्रेअकप झाल्याचे वृत्त समोर आले होते. हे कपल गेल्या चार वर्षांपासून रिलेशनमध्ये होते, पण त्यांनी काही कारणामुळे वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. त्या सोबतच गेल्या काही दिवसांपासून हे दोघेही वेगवेगळे राहत होते. आता खुद्द अभिनेत्रीनेच ‘Ask Me Anything’ या सेशनमध्ये एका चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देत ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे.

Shruti Haasan Confirms Breakup With Santanu Hazarika
Adinath Kothare : बँकेचे हफ्ते थकले अन् मुंबईत बेघर झालो...; आदिनाथ कोठारेने सांगितला कुटुंबावर ओढावलेला वाईट काळ

श्रुती हासन कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर चाहत्यांच्या ‘Ask Me Anything’ या सेशनमधील चाहत्यांच्या प्रश्नांवर उत्तर दिले आहे. तिला एका चाहत्याने ‘तू सिंगल आहेस की कमिटेड आहे?’ या प्रश्नाचं उत्तर तिने व्हिडीओच्या माध्यमातून दिले.

ती म्हणते, “मला अशा प्रश्नांचे उत्तर द्यायला अजिबात आवडत नाही. पण मी पूर्णपणे सिंगल आहे आणि मला मिंगल नाही व्हायचंय. सध्या मी फक्त कामच करत आहे आणि माझ्या आयुष्याचा आनंद घेत आहे.”

श्रुती आणि शांतनूचा ब्रेकअप झाल्यानंतर दोघांनीही एकमेकांना अनफॉलो करत फोटो डिलीट केले. तेव्हापासून त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. श्रुती आणि शांतनू गेले अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यासोबतच ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही होते. दोघं अनेकदा कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावायचे.

Shruti Haasan Confirms Breakup With Santanu Hazarika
Laapataa Ladies Film : ‘ॲनिमल’ पेक्षा ‘लापता लेडीज’ ठरली जबरदस्त, काही दिवसातच नेटफ्लिक्सवर मिळाले मिलियन्स व्ह्यूज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com