Anand Mahindra: 'मुंबई नाही, ही तर दुबई'; रस्ते तुंबले, वाळंवटात पावसाचा कहर VIDEO व्हायरल

Dubai Rain Video Viral: आनंद महिंद्रांनी दुबईतील पावसाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
Dubai Rain
Dubai Rain Video ViralSaam Tv
Published On

दुबईमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, रस्त्यांवर सर्वत्र पाणीचपाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. वाळवंटातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं आहे. आनंद महिंद्रांनी (Anand Mahindra Shares Dubai Rain Video) दुबईतील पावसाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 'मुंबई नाही, ही तर दुबई' असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिला (Dubai Rain) आहे.

संपूर्ण वर्षभर पडतो, तितका पाऊस काही तासांच्या कालावधीमध्ये दुबईत पडला (Dubai Rain Video Viral) आहे. त्यामुळे दुबईची तुंबई झाल्याचं दिसत आहे. सोमवारी रात्रीपासून मंगळवार सकाळपर्यंत यूएईच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडल्याचं समोर येत आहे. अतिवृष्टीनंतर पूरसदृश परिस्थिती दुबईमध्ये निर्माण झाली होती. जोरदार पाऊसामुळे अनेक शहरे ठप्प झाली आहेत.

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिद्रा (Anand Mahindra) यांनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, रस्ते खचाखच पाण्याने भरलेले आहेत. रस्त्यावर गाड्या पाण्यामधून प्रवास करत असल्याचं दिसत आहे. पुलाखाली पाणी साचलेले आहे. नरज पुरेल तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. वाहनांना रस्त्यावरून प्रवास करणं कठीण झालेलं (Dubai Rain Video) आहे. आनंद महिंद्रांनी २८ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे.

मुसळधार पाऊस झाल्यामुळे विमानतळ, मेट्रो स्टेशनसह रस्ते दुबईमध्ये पाण्याखाली गेले आहेत. याशिवाय शेकडो इमारतींमध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मंगळवारी दुबई विमानतळावर (viral news) अवघ्या १२ तासांत सुमारे १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर २४ तासांत एकूण १६० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Dubai Rain
Student Viral Video: जिंकलस मित्रा! शाळकरी मुलगा चक्क धावत्या स्कूटीवर करतोय अभ्यास;VIDEO VIRAL

दुबई शहरात वर्षभरात सुमारे ८८.९ मिमी पावसाची नोंद (Viral) होते.पूरस्थिती निर्माण झाल्याने शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आलीय. पुढील काही तासांत दुबईमध्ये तुफान पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. काम असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे. दुबईतील पावसाचे फोटो (viral video) आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Dubai Rain
Viral Video : फिश मार्केटमध्ये दोन महिलांमध्ये तुफाना राडा; एकमेकींना थेट मासे फेकून मारले, VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com