आपल्या अतरंगी आणि हटके फॅशन सेन्समुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेद (Uorfi Javed) नेहमी वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडते. सध्या उर्फी जावेद अडचणीत आहे. यामागचे कारण म्हणजे उर्फी जावेदविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदचा पोलिसांनी अटक केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आता उर्फी जावेदने आज ओशिवरा पोलिस ठाण्यात हजेरी लावत आपला जबाब नोंदवला आहे.
प्रसिद्धी आणि चर्चेत राहण्यासाठी उर्फी जावेद काहीही करत असते. नवनवीन फंडा ती वापरत असते. पण आता उर्फीला प्रसिद्धीसाठी वापरलेला फंडाच भारी पडला आहे. उर्फी जावेदने काही दिवसांपूर्वी ओशिवरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोखंडवाला बॅक रोड परिसरात बनावट पोलिसांच्या सहाय्याने अटक करण्याचा एक व्हिडिओ तयार केला होता. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता.
उर्फीने हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला होता. हे कृत्य करणं उर्फीला महागात पडले. याप्रकरणी तिच्याविरोधात ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर उर्फी दुबईला गेली होती. मात्र अखेर आज सकाळीच ऊर्फी जावेद मुंबईत दाखल झाली. त्यानंतर ती थेट ओशिवरा पोलिस ठाण्यात पोहोचली. यानंतर ओशिवरा पोलीसांनी तिचा जबाब नोंदवला आहे.
उर्फीच्या या व्हिडीओमध्ये दिसत होते की, उर्फी जावेद कॉफी शॉपमध्ये असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी या कॅफेच्या बाहेर पोलिसांची गाडी येते. दोन महिला पोलिस या कॉफी शॉपच्या बाहेर जाऊन उर्फीला बोलावतात. उर्फी पोलिसांकडे येते खरं पण पोलिस तिला आमच्यासोबत पोलिस ठाण्याला यावे लागेल असे सांगताना दिसतात. उर्फी पोलिसांना ताब्यात घेण्यामागचे कारण विचारत हुज्जत घालते. तर पोलिस तिला म्हणतात इतके छोटे कपडे घालून कोण फिरते? त्यानंतर पोलिस उर्फीला गाडीमध्ये बसवतात आणि घेऊन जातात. उर्फीला पोलिसांनी अटक केलेला हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिचे चाहते चिंतेत आले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.