Urfi Javed New Dress: हीच खरी चहा लव्हर! चहाचा मळा अंगावर घेऊन फिरतेय उर्फी जावेद; व्हिडिओ होतोय व्हायरल

Urfi Javed Wear Tea Bags Dress: उर्फी जावेदने टी-बॅगचा वापर करून तिचा ड्रेस बनवला आहे.
Urfi Javed Wear Tea Bags Dress
Urfi Javed Wear Tea Bags DressSaam TV

Urfi Javed Made A Dress With Tea Bags : अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. तिच्या या फॅशनमुळे अनेक मोठंमोठे फॅशन डिझायनर्स उर्फी जावेदसोबत काम करतात. दरम्यान, अभिनेत्रीचा एक नवीन व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने टी-बॅगचा ड्रेस घातला आहे. उर्फीचा हा अवतार पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे.

उर्फी नेहमीच वेगवगेळे प्रयोग करत असते. असाच एक भन्नाट प्रयोग उर्फीने केला आहे. यावेळी उर्फी जावेदने टी-बॅगचा वापर करून तिचा ड्रेस बनवला आहे. तिने स्वतः तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी जावेद ग्रीन टी बनवत पीत असल्याचे दिसत आहे. (Latest Entertainment News)

Urfi Javed Wear Tea Bags Dress
Sulochana Latkar Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर काळाच्या पडद्याआड, मराठी सिनेसृष्टी हळहळली

यादरम्यान, तिला अचानक काहीतरी सुचत आणि ती टी-बॅगपासून तिचा ड्रेस बनवते. उर्फी जावेदने टी-बॅगपासून बनवलेला ड्रेस घालून आणि तिच्या क्रिएटिव्हिटीमुळे खूप आनंदी दिसत आहे. उर्फी जावेदने या व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हॅलो मित्रांनो, चहा प्या.'

पुढे जाऊन उर्फीने तिच्या ड्रेस वर गरम पाणी ओततात हा खरंच टी-बॅगपासून बनलेला ड्रेस आहे, हे दाखवत आहे. उर्फीने काहीतरी केले आणि ती ट्रोल झाली नाही असे होऊ शकत नाही. तर उर्फीला ट्रोल करत एका नेटकाऱ्याने लिहिले आहे, चालते फिरते चहाचे दुकान.

आणखी एका नेटकाऱ्याने लिहिले, दीदी, काय केलं तर तुम्ही गप्प राहाल. तिसर्‍या नेटकाऱ्याने लिहिले आहे, दीदी सुधारली आहे... आज पूर्ण कपड्यात तुम्ही खूप सुंदर दिसत आहात... मी म्हणतो साडी घाला, देव तुम्हाला बुद्धी देवो. एका यूजरने लिहिले आहे की, 'उर्फी खूप क्रिएटिव्ह आहे.'

यापूर्वी उर्फी अबू जानी आणि संदीप खोसला या डिझायनर्ससोबत वर्कआउट करताना दिसली होती. तर, नुकतीच ती डिझायनर अमित अग्रवालसोबत दिसली. उर्फी जावेदच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, त्याने 2016 मध्ये टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तिने करिअरची सुरुवात केली. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त उर्फी जावेद 'बिग बॉस ओटीटी' आणि 'स्प्लिट्सविला' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com