Sulochana Latkar Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर काळाच्या पडद्याआड, मराठी सिनेसृष्टी हळहळली

Sulochana Latkar Died: सुलोचना यांना आज मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Sulochana Latkar
Sulochana LatkarSaam TV
Published On

Sulochana Latkar Passed Away At Age 94 : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले आहे. सुलोचना यांना आज मुंबईतील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

सुलोचना दीदींच्या मुंबई प्रभादेवी येथी राहत्या घरी उद्या सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अंत्यदर्शन करता येणार आहेत. सोमवारी सायंकाळी ५: ३० वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सुलोचना लाटकर यांना काही दिवसांपुर्वी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांना श्वसनाशी संबंधित आजाराने ग्रासल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्या बऱ्या होऊन घरी परतल्या होत्या. मात्र आज अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टी तसेच बॉलिवूडवर देखील शोककळा पसरली आहे. (Latest Entertainment News)

Sulochana Latkar
Sulochana Latkar Hospitalize: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची प्रकृती चिंताजनक, रूग्णालयात दाखल...

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सुलोचना लाटकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट करत ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या विषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांनी आपल्या व्यावसायिक आयुष्यात अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

सुलोचना यांचा जन्म ३० जुलै १९२८ रोजी झाला असून त्यांनी सिनेसृष्टीत १९४३ मध्ये पदार्पण केले. आपल्या सोज्वळ दिसण्यानं आणि सहजसुंदर अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलं.

आजही सुलोचना लाटकर यांच्याबद्दल चाहत्यांच्या मनात सोज्वळ, शांत आई अशी प्रतिमा कायम आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये सुलोचना यांनी अनेक घरंदाज भूमिका साकारल्या आहेत. सुलोचनादीदींनी २५०हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांचे अनेक चित्रपट अनेक थिएटरमध्ये फारच गाजले आहेत. (Movie)

सुलोचना लाटकर या काशिनाथ घाणेकर यांच्या सासू होत्या. काशिनाथ घाणेकर यांची दुसरी पत्नी कांचन घाणेकर यांच्या सुलोचना आई होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com