अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) वतीने नुकतंच जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. २०२४ चा जीवनगौरव पुरस्कार मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकारांना मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिनी हट्टंगडी (Rohini Hattangadi) यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. या पुरस्काराविषयीची घोषणा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाकडून करण्यात आलेली आहे.
मराठी नाट्यसृष्टीमध्ये, आपल्या कामाच्या माध्यमातून भरीव योगदान देणाऱ्या नाट्य कर्मींचा यावेळी गौरव केला जाणार आहे. १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या 'नाट्यकलेचा जागर' या कार्यक्रमातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यावाचन सह अनेक कार्यक्रम यावेळी होणार आहेत. १४ जून २०२४ रोजी मुंबईतील माहिममधील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. सर्व पुरस्कारांचे वितरणही यावेळी केली जाणार आहे, अशी माहिती नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून कोणत्याही पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर काही दिवसांतच मंडळाकडून हे पुरस्कार देण्याचे योजले आहे. मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रदिर्घ नाट्यसेवा पुरस्काराने सन्मानित केले आहे. आता त्यानंतर अशोक सराफ यांना नाट्य परिषदेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.