57th Maharashtra State Film Awards: : अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३' प्रदान

veteran Actor Ashok Saraf : एकांकिकासाठी पुरस्कार मिळण्यापासून ते महाराष्ट्राचा नंबरचा पुरस्कार मिळणं ही मोठी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया पुरस्कार मिळण्याआधी ज्येष्ठ नेते अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिलीय.
Veteran Actor Ashok Saraf
Veteran Actor Ashok Saraf Saam Tv

(गिरीश कांबळे, मुंबई)

Veteran Actor Ashok Saraf awarded Maharashtra Bhushan Award :

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२३' प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. मुंबईमध्ये आयोजित या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्यासह मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांचा सन्मान केला गेला.(Latest News)

महाराष्ट्र भुषण मिळतोय, यामुळे मला खूप आनंद झालाय. मी कुठू सुरुवात केली होती आणि आज कुठे जातोय. हा प्रश्न पडतोय. एकांकिकासाठी पुरस्कार मिळण्यापासून ते महाराष्ट्राचा नंबरचा पुरस्कार मिळणं ही मोठी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया पुरस्कार मिळण्याआधी ज्येष्ठ नेते अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिलीय.

वाचा विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट कथा- स्व.बा. बोरकर (पांघरुण)

सर्वोत्कृष्ट पटकथा- विक्रम फडणीस (स्माईल प्लिज)

सर्वोत्कृष्ट संवाद- इरावती कर्णीक (आनंदी गोपाळ)

सर्वोत्कृष्ट गीत- संजय कृष्णाजी पाटील (हिरकणी)

सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीत- प्रफुल्ल-स्वप्निल

सर्वोत्कृष्ट संगीत- अमित राज

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक -सोनू निगम

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायका- मधुरा कुंभार (हिरकणी)

सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- सुभाष नकाशे (हिरकणी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- नंदिता पाटकर (बाबा)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- रोहित फाळके

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता- पार्थ भालेराव

सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री- अंकिता लांडे

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता- दीपक डोबरियाल (बाबा)

प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती- झॉलिवूड

प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक -अच्युत नारायण (वेगळी वाट)

सामाजिक प्रश्न हताळणारा दिग्दर्शक- समीर विध्वंस (आनंदी गोपाळ)

दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्रमांक-1 - अजित वाडीकर- चित्रपट- वाय

चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार- गजेंद्र अहिरे

चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान- 2022- नागराज मंजुळे

स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार- 2022 हा पुरस्कार विधू विनोद चोप्रा आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार-2021 हा पुरस्कार सोनू निगम यांना प्रदान करण्यात आला. स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार-2022 हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना प्रदान करण्यात आला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com