सिनेरसिकांसाठी २३ फेब्रुवारी म्हणजे उद्याचा दिवस खूपच खास असणार आहे. २३ फेब्रुवारीला ३ बॉलिवूड (Bollywood) आणि १ मराठी चित्रपट (Marathi Movie) प्रदर्शित होणार आहे. सिनेरसिकांसाठी उद्या ४ चित्रपटांची खास मेजवानी असणार आहे. त्यामुळे मराठी सिनेरसिकांसोबत हिंदी सिनेरसिकांसाठी उद्याचा दिवस मनोरंजनाचा असणार आहे. २३ फेब्रुवारीला यामी गौतमचा 'आर्टिकल 370' (Artical 370), विद्युत जामवालचा 'क्रॅक' (Crakk Movie) आणि शशि भूषणचा 'ऑल इंडिया रँक' (All India Rank Movie) हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर दिलीप प्रभावळर यांचा 'आता वेळ झाली' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतमचा 'आर्टिकल 370' (Article 370 Movie) हा चित्रपट २३ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. यामी गौतम या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहे. या चित्रपटाची निर्मिती यामीचा पती आदित्य धरने केली आहे. तर दिग्दर्शन आदित्य झांबळे यांनी केले आहे. काश्मिरमधील कलम 370 हटवल्याच्या आसपासच्या घटनांचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. या ऐतिहासिक निर्णयामागे काम करणाऱ्या सर्वांची कहाणी या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे. या चित्रपटामध्ये यामी गौतमीसोबतच प्रिया मणी, वैभव तत्ववादी, किरण करमरकर आणि अरुण गोविल मुख्य भूमिकेमध्ये आहेत.
बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार विद्युत जामवाल (Vidyut Jammwal), अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) स्टारर 'क्रॅक-जीतेगा तो जीएगा' (Crakk Jitega To jiyega Movie) हा चित्रपट २३ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. विद्युत जामवाल या चित्रपटामध्ये अर्जुन रामपालसोबत फायटिंग करताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये विद्युतच्या धमाकेदार अॅक्शनची झलक पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्तने केले आहे.
ऑल इंडिया रँक हा चित्रपट (All India Rank Movie) देखील २३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये बोधिसत्व शर्मा , समता सुधीक्षा , शशि भूषण , गीता अग्रवाल आणि शीबा चड्ढा हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन वरुण ग्रोवर यांनी केले आहे. संजय राउतरे आणि सरिता पाटील हे दोघे या चित्रपटाचे निर्माते आहेत. BHU IIT मधून अभियांत्रिकी करणाऱ्या वरुण ग्रोवरचा 'ऑल इंडिया रँक' हा चित्रपट त्याच्याच पौगंडावस्थेतील कथेवर आधारित आहे.
दिलीप प्रभावळकर आणि रोहिनी हट्टगंडी यांच्या 'आता वेळ झाली' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट २३ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. 'इच्छामरण' या एका शब्दावर आधारलेल्या 'आता वेळ झाली'हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये, दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह भारत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.