
केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक घोषणा होण्याची शक्यता आहे. शेतकरी, महिला, करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी खास घोषणा होऊ शकते. महिलांसाठी केंद्र सरकारने महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजना राबवली आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख मार्च २०२५ आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची मुदत वाढवू शकतात.
महिला सन्मन सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत गुंतवणूकीवर चांगले व्याज मिळते. या योजनेत अजूनही अनेक महिलांना गुंतवणूक करायची आहे.त्यामुळे कदाचित गुंतवणूकीची शेवटची तारीख वाढवू शकते.
महिला सेव्हिंग सन्मान सर्टिफिकेट योजनेत ७.५ टक्के व्याज मिळते. या योजनेत कमीत कमी १००० रुपये तर जास्तीत २ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकतात. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड २ वर्षांचा आहे. या योजनेत कलम 80C अंतर्गत टॅक्स बेनिफिट मिळतो.
या योजनेबाबत अर्थसंकल्पात मोठा निर्णय होऊ शकतो. या योजनेत जर मुदतवाढ केली तर महिलांना दिलासा मिळणार आहे.या योजनेत तुम्ही एकदा खाते उघडल्यावर ६ महिन्यांनी बंद करु शकतात. परंतु त्यावर तुम्हाला २ टक्के कमी व्याज मिळणार आहे. या योजनेत खाते उघडल्यानंतर १ वर्षांनी ४० टक्के रक्कम काढू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.