मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर राज्यात सत्ताधारी महायुतीने अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचा देखील समावेश आहे. या योजनेद्वारे राज्यातील महिलांना दरमहिना १५०० रूपयांची आर्थिक मदत सरकार देत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुका ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने सत्ताधारी पक्षाने ही योजना सुरू केलीय, असा आरोप विरोधक करत आहेत. आता खरंच महायुतीला विधानसभा निवडणुकीत 'लाडकी बहीण योजने'चा फायदा होणार का? हे जाणून घेवू या.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक लोकोपयोगी योजना सुरू केल्यात. यामध्ये 'लाडकी बहीण योजना' ही प्रमुख आहे. सरकारने ८० लाख महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा केले (Maharashtra Politics) आहेत. महिला सक्षमीकरणावर भर देणारं हे पाऊल गेम चेंजर असल्याचं महायुतीने म्हटलंय. याबाबत राज्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि सेफॉलॉजिस्ट दयानंद नेने यांनी १६ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान राज्यात सर्वेक्षण केलंय. यामध्ये त्यांनी 'लाडकी बहीण योजने'चा महायुतीला फायदा होणार का? असा एक प्रश्न देखील विचारलेला होता.
सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर
सर्वेक्षण केलेल्या एकूण लोकांपैकी ४० टक्के लोकांनी महायुतीला फायदा होईल, असं सकारात्मक प्रतिसाद दिलाय. मात्र ३७ टक्के लोकांनी नकारार्थी उत्तर दिलंय. तर २३ टक्के लोकांनी माहिती नसल्याचं नमूद (Maharashtra opinion poll 2024) केलंय. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी मोठे कार्यक्रम देखील आयोजित केले होते. महाआघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने लाडकी बहीण योजनेवर निवडणूकपूर्वी प्रचार केंद्रित केलाय. या योजनेमुळे महायुतीच्या बाजूने कोणतीही लाट निर्माण झालेली नाही, असं मत दयानंद नेने यांनी सर्वेक्षणाच्या निकालानंतर व्यक्त केलंय.
ही योजना निवडणूक स्टंट असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केलीय. सरकार फुकटात पैसे वाटप करत असेल तर का सोडायचं? असं देखील अनेकजण म्हणत आहेत. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्या अशी व्यक्तिगत प्रतिक्रिया नेने यांनी दिलीय. कारण आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या कुटुंबातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ (ladKi behna yojana) मिळालेला आहे, याबाबत राज्य सरकारने चौकशी करावी, असं देखील नेने म्हणाले आहेत.
'लाडकी बहीण योजने'चा महायुतीला फायदा होणार?
यंदा राज्यात अर्थसंकल्पात महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेसाठी अर्जदार महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त (assembly election 2024) नसावं. महिलेच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य आयकर भरत असेल, तर ती महिला या योजनेसाठी पात्र नाही. राज्यातील सुमारे दीड कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरण्याची अपेक्षा आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या योजनेला (mahayuti) थेट विरोध केला नसून प्रश्न उपस्थित केलेत. ही योजना निवडणूक स्टंट असल्याची टीका विरोधकांकडून केली जातेय. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या ९ ऑक्टोबरला निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल, असा अंदाज आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या योजनेचा किरकोळ लाभ महायुती सरकारला मिळताना दिसत असल्याचं सर्वेमधून दिसतंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.