
केंद्र सरकारकडून देशातील विविध विभागांत अनेक प्रकारच्या बचत योजना राबवल्या जातात. महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी आणि महिलांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारकडून महिलांसाठी विशेष योजना राबवण्यात येतात. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही योजना महिलांसाठी लाभदायक आहे. या योजनेतून व्याजाच्या स्वरुपात उत्तम परतावा मिळतो. या योजनेची सुरूवात १ एप्रिल २०२३ साली झाली होती. या योजनेतून प्रत्येक महिलांना लाभ मिळत असून, फक्त महिलांनाच यासाठी खाते उघडता येते.
किमान १००० कमाल २ लाख जमा करू शकता
एमएसएससीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास व्याजाच्या स्वरुपात उत्तम परतावा मिळतो. गुंतवणूक केलेल्या रकमेमध्ये आपल्याला ७.५ टक्के व्याज मिळते. या योजनेंतर्गत आपण किमान १००० रूपये आणि कमाल २ लाख रूपये जमा करू शकता. २ वर्षांसाठी आपण या योजनेत पैसे गुंतवणूक करू शकता. तसेच गरज भासल्यास १ वर्षानंतर ४० टक्के रक्कम देखील काढू शकता. या याजनेंतर्गत आपण पत्नीच्या नावावर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता.
२ लाख जमा करा अन् व्याजाच्या स्वरुपात उत्तम परतावा मिळवा
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेंतर्गत आपण २ लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कम गुंतवणूक करू शकता. जर आपण २ लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक केली तर, या रकमेवर ७.५ टक्के व्याज मिळेल. यानुसार मॅच्युरिटीवर एकूण २,३२,०४४ रूपये मिळतील. म्हणजेच २ लाख रूपयांच्या ठेवीवर एकूण ३२,०४४ रूपये व्याज मिळेल.
मुलगी किंवा आईच्या नावानेही खाते उघडता येईल
जर आपण अद्याप विवाहित नसाल तर, तुम्ही तुमच्या आई किंवा मुलीच्या नावाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. याचा फायदा प्रत्येक महिलेला होतो. तसेच दोन वर्षात अधिक गुंतवणूक होते आणि अधिकचे व्याजही मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.