
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या खातेदारांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. आता नोकरी बदलल्यानंतर तुमचे ईपीएफ खाते ट्रान्स्फर करण्यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. खातेदार स्वतः कंपनीच्या हस्तक्षेपाशिवाय ईपीएफ खाते हस्तांतरित करू शकतो. तसेच ईपीएफओमध्ये अकाऊंटच्या तपशीलांमध्ये काही चुका असतील तर त्या स्वतः दुरुस्त केल्या जाऊ शकतात. तसेच ईपीएफ पेन्शन नियम सुधारणांअंतर्गत, किमान पेन्शनची रक्कम वाढवण्याचाही विचार केला जात आहे.
अशा पद्धतीने खाते ट्रान्सफर करा
ईपीएफओ खातेदारांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे. आता ईपीएफओ वापरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी अनेक सुधारणा केल्या जात आहेत. याबाबतची माहिती नुकतीच केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, आता कंपनीच्या हस्तक्षेपाशिवाय ईपीएफ खाते हस्तांतरित केले जाऊ शकते. यासाठी युएएन आधारशी लिंक असणे गरजेचं आहे. परंतु या नवीन बदलानंतर खातेदार स्वतः चुका सुधारू शकतात. हे बदल आपण ऑनलाइनद्वारे करू शकता.
पर्सनल डीटेल अपडेट
ईपीएफओने पीएफ खातेधारकांना वैयक्तिक तपशील अपडेट करण्याची सुविधा देखील दिली आहे. खाते उघडताना, जन्मतारीख, नाव किंवा इतर तपशील चुकीचे भरले असल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी अर्ज सादर करावा लागतो. ज्यामध्ये खूप वेळ लागत होता. परंतु, या नवीन बदलानंतर खातेदार स्वतः चुका सुधारू शकतात. यासाठी तुम्ही फक्त ऑनलाइन बदल करू शकता.
देशभरातील सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टम (CPPS) सुरू करण्यात आली आहे. ६८ लाखांहून अधिक पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. ज्यामध्ये कोणतीही लाभार्थी व्यक्ती, कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकते. याशिवाय पीएफचे पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डसारखे कार्ड आणण्याची तयारी सुरू आहे. आपण या कार्डद्वारे एटीएम मशीनमधून पीएफचे पैसे काढू शकाल. यामुळे ईपीएफओ खातेधारकांना नक्कीच फायदा होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.