Dharashiv case: सफाई कर्मचारी महिलेकडं शरीरसुखाची मागणी, लिपिकावर आरोप; कळंब पालिकेतील धक्कादायक प्रकारानं खळबळ

Crime News: नोकरी लावली म्हणून आधी १ लाख रूपये मागितले. एक लाख रूपये देता येत नसेल तर, थेट शरीर सुखाची मागणी केली. धाराशिवमध्ये पीडित महिलेनं लिपिक कर्मचाऱ्याविरोधात मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली.
Dharashiv crime
Dharashiv crimeSaam Tv
Published On

नोकरी लावली म्हणून आधी १ लाख रूपये मागितले. एक लाख रूपये देता येत नसेल तर, थेट शरीर सुखाची मागणी केली. शरीर सुखाची मागणी पूर्ण करता येत नसेल तर, कामावरून काढण्याची धमकी नगर परिषद कळंब आस्थपना विभागातील लिपिक कर्मचाऱ्यानं पीडित महिलेकडे केली. वारंवार याच गोष्टीला त्रासलेल्या पीडित महिलेनं थेट मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल केली. ही धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली असून, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कळंब आस्थपना विभागातील लिपिक कर्मचारी कैलास दत्तात्रय हाके यानं एका महिलेला कामावर लावलं. सफाई कर्मचारी म्हणून तिला धाराशिवच्या नगर परिषद कळंब कामावर लावले. कामावर रूजू झाल्यानंतर काही दिवसांनी कैलासनं महिलेचा छळ करण्यास सुरूवात केली. महिलेकडे कामावर लावलं म्हणून स्वत:ला ५० हजार आणि आस्थापना विभागातील प्रमुख अजय काकडे यांना ५० हजार असे एकूण १ लाख रूपयांची मागणी केली.

Dharashiv crime
Forest tourism rules: वन पर्यटनासाठी नवी नियमावली, उल्लंघन केल्यास २५ हजारांचा दंड, मोबाईल फोनवरही बंदी

तसेच पैसे देता येत नसेल तर, थेट नराधम कर्मचाऱ्यानं पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. महिलेनं वारंवार नकार दिला. तरी देखील महिला कर्मचारी जिथे काम करत असेल तिथे जाऊन त्यानं महिलेसोबत अश्लील भाषेत शरीर सुखाची मागणी केली. पैसे अथवा शरीर सुखाची मागणी पूर्ण करता येत नसेल तर, कामावरून काढून टाकण्याची धमकी देखील नराधम कर्माचाऱ्यानं दिली होती.

Dharashiv crime
Maharashtra guardian ministers: पालकमंत्रिपदासाठी इतका हावरटपणा का? संजय राऊतांचा सवाल, मुख्यमंत्री लाचार असल्याचीही टीका

याच त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं थेट मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. कामावर लावले म्हणून १ लाख अथवा शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नराधमावर तातडीने कारवाई करण्याची मागणी तक्रारीत केली आहे. या प्रकरणी नगर परिषद प्रशासनाकडून तक्रारीची दखल घेण्यात आली असून, विशाखा समीती स्थापन करुन चौकशी करणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com