Maharashtra guardian ministers: पालकमंत्रिपदासाठी इतका हावरटपणा का? संजय राऊतांचा सवाल, मुख्यमंत्री लाचार असल्याचीही टीका

Sanjay Raut: पालकमंत्रिपदावरून नाराजीनाट्य सुरू असताना, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत काही सवाल उपस्थित केले आहेत. पालकमंत्रीपदासाठी इतका हावरटपणा का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
Sanjay Raut Press Conference
Sanjay Raut Press ConferenceSaam Tv
Published On

राज्य सरकारकडून शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. ही यादी जाहीर होताच काही नेते नाराज झाले. तर काहींनी नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली. यात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून गदारोळ सुरूय. नाशिकमध्ये भाजपचे गिरिश महाजन आणि रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांना पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आलीय. मात्र, यानंतर एका दिवसात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. पालकमंत्रिपदावरून नाराजीनाट्य सुरू असताना, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत काही सवाल उपस्थित केले आहेत. पालकमंत्रीपदासाठी इतका हावरटपणा का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

पालकमंत्रीपदावरील नाराजीनाट्यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्रिपदाची घोषणा करून विदेशात गेले. उदय सामंत त्यांच्याबरोबर आहेत. एकनाथ शिंदे हे नाराज होऊन दरे गावात गेले होते, त्यांची यासंदर्भात खरी नाराजी आहे. पालकमंत्रिपद हे निमित्त आहे. इतके बहुमत असलेले मुख्यमंत्री आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात, हे आश्चर्य आहे. पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ का आली? असा सवाल पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Sanjay Raut Press Conference
Bhiwandi corruption case: भिवंडीच्या सहायक पालिका आयुक्ताला अटक, ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

पालकमंत्रिपदासाठी इतका हावरटपणा का?

पालकमंत्रिपदासाठी नेत्यांची रस्सीखेच सुरू असताना, संजय राऊत यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. 'पालकमंत्रिपदासाठी इतका हावरटपणा का? आपण मंत्री आहात, आपण संपूर्ण राज्याते काम करतात. जेव्हा एखादा मंत्री असतो, तो राज्याचा असतो, जिल्हा किंवा तालुक्याचा असतो का? पालकमंत्रिपदावरून जो काही गदारोळ सुरूय, तो आर्थिक व्यवहारांसाठी सुरूय' असा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.

Sanjay Raut Press Conference
Guillain-Barré Syndrome in Pune: पुण्यात गुईलेन सिंड्रोम आजाराची दहशत, २२ संशयित रूग्ण, लक्षणं काय?

नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं मोठं बजेट असतं. त्यामुळे कुणाला तरी नाशिकचं पालकमंत्रिपद हवंय. रायगडमध्ये अनेक उद्योग असल्यानं जास्तीत जास्त खंडण्या कशा गोळा करता येतील, असा तिकडे एक हिशोब आहे. त्यामुळे आर्थिक देवाणघेवाण आणि हावरटपणातून पालकमंत्रिपदासाठी मारामारी सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच पालकमंत्रिपदावरून मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हतबल, लाचार मुख्यमंत्री आहे, हे दाखवून दिले असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com