Pune Crime: दारू पिण्यास पैसे न दिल्याने आई आणि भावावर कोयत्याने हल्ला, पुण्यात खळबळजनक घटना

Crime News: सेनापती बापट रस्ता परिसरातील रामोशीवाडीत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे एका वादात गणेशने आई आणि भावावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीरपणे जखमी झाले असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
Pune Crime
Pune CrimeSaam tv
Published On

सेनापती बापट रस्ता परिसरातील रामोशीवाडीत एका वादातून दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे आई आणि भावावर कोयत्याने हल्ला करण्याची घटना घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी गणेश अरुण जाधव (वय २८, रा.रामोशीवाडी, रत्ना हॉस्पिटलमागे, गोखलेनगर) याला अटक केली आहे.

याबाबत गणेशच्या मोठ्या भावाने, दिगंबर जाधव (वय ३५), चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गणेशने केलेल्या हल्ल्यात दिगंबर आणि त्यांची आई जखमी झाले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्याच्या कारणामुळे पोलिसांनी तपास सुरु केला असून, आरोपीच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Pune Crime
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना अरेरावी, कुणाल बाकलीवालला अटक

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गणेश याला दारू पिण्याची लहानपणापासूनच आवड आहे. शनिवारी (२५ जानेवारी) सायंकाळी सात वाजता गणेश घरी परतला आणि त्याने आईकडून दारू पिण्यासाठी २०० रुपये मागितले. आईने पैसे देण्यास नकार दिला, त्यामुळे गणेश चिडला आणि त्याने आईला शिवीगाळ केली. त्यानंतर मारहाण सुरू केली.

Pune Crime
Maharashtra Politics: भंडाऱ्यात भाजपला जोरदार धक्का, काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा

मोठा भाऊ दिगंबर याने गणेशला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण गणेशने घरात ठेवलेला कोयता उचलला आणि दिगंबर यांच्यावर हल्ला केला. कोयत्याने त्याच्या डोक्यात जोरदार वार केला. या घटनेदरम्यान, आईने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, मात्र गणेशने तिच्या डोक्यातही कोयत्याने वार केला. या हल्ल्यात दिगंबर आणि त्यांची आई गंभीरपणे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी गणेशला अटक करून तपास सुरू केला आहे.

Pune Crime
Viral Video: वाह...! विदेशी महिलेने सेल्फीसाठी १०० रुपये आकारून सुरू केला अनोखा बिझनेस, पाहा व्हायरल VIDEO

घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहाय्यक आयुक्त विठ्ठल दबडे आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील घटनास्थळी पोहोचले. जखमींना त्वरित ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. आई आणि भावाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी गणेश याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गणेश धामणे या प्रकरणाची सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई सुरु केली असून, या हल्ल्याची सर्वांगिण तपासणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com