Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना अरेरावी, कुणाल बाकलीवालला अटक

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम व्यावसायिक कुणाल बाकलीवालला अटक करण्यात आली. तो मिल कॉर्नर चौकात गाडी सुसाट वेगाने चालवत आणि व्हीआयपी सायरन वाजवत पोलिसांच्या नियमांचे उल्लंघन करताना आढळला.
Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagarsaam tv
Published On

छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम व्यावसायिक कुणाल बाकलीवालला पोलिसांनी अटक केली आहे. मिल कॉर्नर चौकात बाकलीवाल सुसाट वेगाने गाडी चालवत व्हीआयपी सायरन वाजवत होता. वाहतूक पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि पोलिसांना निलंबित करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करत बेड्या ठोकल्या.

छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक कुणाल बाकलीवालची महागडी डिफेंडर गाडी जप्त केली आहे. २४ जानेवारीच्या सायंकाळी मिल कॉर्नर सिग्नलवर ट्राफिक पोलीस दैनसिंग जोनवाल आणि सहाय्यक फौजदार बागूल कर्तव्यावर असताना हा प्रकार घडला. बाकलीवाल व्हीआयपी सायरन वाजवत मोठ्या वेगात गाडी चालवत जात होता. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता, रागाच्या भरात त्याने गाडी चौकाच्या मध्यभागी थांबवली. या घटनाक्रमामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

Chhatrapati Sambhajinagar
Railway Recruitment 2025: पूर्व मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ पदांसाठी अर्ज सुरू, 10वी आणि ITI पास उमेदवारांसाठी भरती

कुणाल बाकलीवालने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत, "तू पहेचानता नही क्या, मै कोन हूँ," असे उर्मटपणे म्हटले. त्याने सहाय्यक फौजदार बागूल यांना "बुढ्ढे, तेरेको ड्युटी करने आती क्या" असे बोलत, माझ्या नादी लागू नको अन्यथा दोन तासांत सर्वांना सस्पेंड करीन अशी धमकी दिली. त्याचा हा उर्मटपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला गेला.

Chhatrapati Sambhajinagar
MP Metro Recruitment: एमपी मेट्रोमध्ये नवीन भरती, परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे धमक्या दिल्या गेल्यास ते आपले कर्तव्य कसे पार पाडतील, असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कुणाल बाकलीवालला अटक केली. बडा बिल्डर असल्याचा माज, प्रचंड पैसा, आणि महागड्या गाड्यांमुळे बाकलीवालला पोलिसांना धमकावण्याची हिम्मत कशी झाली, यावर आता चर्चा होत आहे. या घटनेमुळे लोकांमध्ये संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी वेळीच कारवाई केल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar
SBI Admit Card: SBI लिपिक PET प्रवेशपत्र जारी, जाणून घ्या डाउनलोड करण्यासाठी सोप्या टिप्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com