Badlapur Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Badlapur Video: बदलापूर आंदोलनामुळे रेल्वे खोळंबल्या, प्रवाशांच्या मदतीला नागरिक धावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Badlapur Video Of People Help Railway Passengers: बदलापूरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी काल आंदोलन करण्यात आले. बदलापूर आंदोलनामुळे रेल्वे खोळंबल्या होत्या. यावेळी स्थानिक लोकांना रेल्वे प्रवाशांना जेवण देऊन त्यांना मदत केली.

Siddhi Hande

सध्या देशभरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोलकातामध्ये डॉक्टर महिलेवर अत्याचार झाले त्यानंतर बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा जगभरातून निषेध करण्यात येत आहे. बदलापूरमधील घटनेनंतर बदलापूरकरांनी काल २० ऑगस्ट रोजी आंदोलन केले. बदलापूरकरांनी रेल्वे स्थानकावर आंदोलन केले. (Badlapur Potest)

काल जवळपास १० तास बदलापूर स्थानकावरील रेल्वेसेवा बंद होती. आंदोलकांनी बदलापूर स्थानकावरुन एकही रेल्वे पुढे जाऊन दिली आहे. त्यामुळे लोकल सेवेसोबतच लांब पल्ल्याच्या रेल्वेचादेखील खोळंबा झाला होता. रेल्वेतील प्रवाशांसाठी खाण्या-पिण्याची काहीच सोय नव्हती. अशी परिस्थिती स्थानिक लोकांनी पुढाकार घेत रेल्वे प्रवाशांसाठी जेवणाची सोय केली.याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही संस्थांनी आणि स्थानिक लोकांनी मिळून रेल्वे प्रवाशांसाठी जेवण बनवून दिले. त्यांच्यासाठी खिचडी बनवली होती. ही खिचडी त्यांनी रेल्वेत जाऊन प्रवाशांना दिली होती. यामुळे रेल्वेतील कोणताही प्रवाशी उपाशी राहिला नाही. माणसांनी माणूसकी दाखवत या प्रवाशांना मदत केली. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

सध्याच्या काळात माणसात माणुसकी नसल्याचे दिसत आहे. परंतु या व्हिडिओमुळे माणासांच्या माणुसकीचे पुन्हा दर्शन झाले आहे.काही लोकांनी रेल्वे प्रवाशांसाठी केलेल्या या मदतीचे संपू्र्ण देशभरातून कौतुक होत आहे. hello_mumbai_Official या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Motivation : सकाळी स्वत:ला या ५ सवयी लावा, आयुष्यात खुप पुढे जाल

Donald Trump: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्पविरोधात मोठं आंदोलन, 70 लाख आंदोलक रस्त्यावर , नेमकं कारण काय?

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

Manoj Jarange Effect : जालना पोलिस पाटील भरतीत ‘जरांगे इफेक्ट’! मराठा समाजाच्या उमेदवारांचा डंका

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

SCROLL FOR NEXT