सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी
मुंबई : बदलापुरातील अत्याचाराची घटना ताजी असताना मुंबईच्या नागपाड्यामध्येही एका ८ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. कानातले विक्री करणाऱ्याने चिमुकलीवर हात टाकल्याचा समोर आले आहे. चिमुरडीला कानातले दाखवण्याचा नावाखाली लैंगिक हल्ला केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात काही दिवसांपूर्वी दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानतंर मंगळवारी नाशिकमध्ये एका साडे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानंतर आता मुंबईच्या नागपाडा भागात एका ८ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
मुंबईच्या नागपाड्यात कानातले विक्री करणाऱ्याने ८ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या फेरीवाल्याने चिमुरडीला कानातले दाखवण्याचा नावाखाली लैंगिक हल्ला केल्याचे समोर आले आहे. या घटनेची तक्रार दाखल होताच पोलिसांनी कानातले विक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.
कानातले विक्री करणारा हा फेरीवाला मुलीवर अत्याचार करत होता. त्याचे कृत्य पाहून शेजारी उभ्या असलेल्या महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. हा फेरीवाला पळून जात असताना आरोपीला स्थानिकांनी पकडलं. त्यानंतर स्थानिकांनी आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी या आरोपीला विनयभंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत अटक केली आहे.
बदलापुरात काही दिवसांपूर्वी दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी शाळेतील सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आंदोलकांनी ८ तास रेलरोको केला. मंगळवारी बदलापूरकरांचा उद्रेक करायला पाहायला. यावेळी दगडफेकीची घटना देखील घडली.
नाशिकमध्ये साडेचार वर्षांच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या वावी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. चिमुकली घरासमोर खेळत असताना अपहरण करून अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी गावातील संशयिताला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात नाशिकच्या वावी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.