राजकीय अराजकतेनंतर बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आज शुक्रवारी नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. मात्र काही लोकांनी बंदला विरोध दर्शवत दुकाने बंद करण्यास नकार दिला. त्यानंतर दोन गटात वाद झाला. नाशिकमधील भद्रकाली परिसरातील तणाव वाढला असून जमाव पांगवणाऱ्या पोलिासांवर देखील दगडफेक झाल्याची घटना घडलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, सकल हिंदू समाजाची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाली होती. त्यावेळी भद्रकाली परिसरात दुकानं बंद करण्याच्या मुद्द्यावरुन दोन गटात वाद झाला. दोन गटातील वाद विकोला गेल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमावाने पोलिसांवही दगडफेक केली. सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी दोन गटात वाद झाला. यावेळी आंदोलकांनी दुकानदारांना दुकान बंद करण्याचं आवाहन केलं. पण काही दुकानदारांनी त्यास विरोध केला. त्यामुळे परिसरातील दोन गटात राडा झाला. दरम्यान आता पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणलीय. पोलिसांनी तातडीने भद्रकालीत येणारी वाहने बॅरेकेड्स लाऊन अडविली. मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधारांचा वापर केला.
दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातही तणाव निर्माण झाला होता. छत्रपती संभाजीनगरमधील सीटी चौक पोलीस ठाण्याबाहेर मोठा जमाव जमला होता. महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यावरुन संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. महंत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी घेऊन जमाव सीटी चौक पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाला होता.
याप्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिलीय. नाशिकमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्यात. पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. आपण स्वतः अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. थोड्या वेळात नाशिकला जाणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली. बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज राज्यभरात बंद पाळला जातोय. या अत्याचाराच समर्थन कोणी करू शकत नाही. दोन्ही गटांना शांततेच आवाहन करत चुकणाऱ्यावर कारवाई करावी, अशा सुचना महाजन यांनी दिल्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.