मलकापूर-छत्रपती संभाजीनगर एसटी बसला भीषण अपघात; 33 प्रवाशांना घेऊन निघालेली बस उलटली
Buldhana Bus AccidentSaam TV

Buldhana News : मलकापूर-छत्रपती संभाजीनगर एसटी बसला भीषण अपघात; 33 प्रवाशांना घेऊन निघालेली बस उलटली

Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली. मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या बसला अपघात झाला.
Published on

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यात एक भीषण अपघाताची घटना घडली. मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला अपघात झाला. समोरून भरधाव ट्रक येताना बसचालकाने बस रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट चिखलात रुतून उलटली.

मलकापूर-छत्रपती संभाजीनगर एसटी बसला भीषण अपघात; 33 प्रवाशांना घेऊन निघालेली बस उलटली
Jalna-Jalgaon Railway : खुशखबर! जालना-जळगाव रेल्वे धावणार, कोणकोणत्या तालुक्याला थांबा मिळणार? जाणून घ्या...

सुदैवाने या अपघातात (Bus Accident) कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याने अपघातात 5 प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष सतीश रोठे यांनी देखील अपघातस्थळी बचावकार्य केले. अपघातातील जखमी प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. विशेष बाब म्हणजे, स्थानिकांनी अपघाताची माहिती दिल्यानंतरही पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले नव्हते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघाली होती. या बसमधून तब्बल 33 प्रवासी प्रवास करीत होते. शनिवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास बस परडा गाव् फाट्या नजिकच्या वळणावर आली.

त्याचवेळी समोरून सुसाट वेगाने ट्रक आला. या ट्रकला बघताच बसचालकाने बस थेट रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी चिखल असल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातच बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यावेळी बसमधील प्रवाशानी आरडा ओरड केली.

मलकापूर-छत्रपती संभाजीनगर एसटी बसला भीषण अपघात; 33 प्रवाशांना घेऊन निघालेली बस उलटली
Amravati News : नकली दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड; अमरावतीमध्ये लाखो रुपयांचा साठा जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com