Amravati News : नकली दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांची धाड; अमरावतीमध्ये लाखो रुपयांचा साठा जप्त

Amravati News : अमरावती गुन्हे शाखेच्या पोलीस विभागाने कारखाना उध्वस्त केला. यामध्ये लाखो रुपयांचा नकली देशी दारू, केमिकलचा माल सुद्धा जप्त केला आहे
Amravati News
Amravati NewsSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: अमरावती शहरातील जुनी एमआयडीसी परिसरात नकली देशी दारू बनविण्याचा कारखाना सुरु होता. या ठिकाणी नकली रजिस्ट्रेशन नंबर टाकून लाखो रुपयाची देशी दारू विकणाऱ्यावर अमरावती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. देशी दारू बनविण्याचे काम सुरु असताना पोलिसांनी येथे धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

Amravati News
Shirdi Airport : शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस; ग्रामपंचायत मालमत्ता कराचे ८ कोटी थकविले

अमरावतीच्या (Amravati) जुनी एमआयडीसी परिसरात हर्ष सपकाळ नावाच्या गृहस्थाने जागा भाड्याने घेऊन नकली देशी बॉबी दारू बनवण्याचा गोरख धंदा गेल्या पाच महिन्यापासून सुरू केला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर (Police) पोलिसांनी येथे गुरुवारी रात्री धाड टाकत अमरावती गुन्हे शाखेच्या पोलीस विभागाने कारखाना उध्वस्त केला. यामध्ये लाखो रुपयांचा नकली देशी दारू, केमिकलचा माल सुद्धा जप्त केला आहे. 

Amravati News
Dhule Crime : रस्त्यामध्ये जबरी लूट; टोळीच्या आझादनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

हर्ष सपकाळ हा मुंबईवरून केमिकल विकत आणून अहमदनगर कोपरगाव येथील कंपनीच्या नावाने बॉबी ९० मिली बॉटलवर नकली रजिस्ट्रेशन नंबर टाकून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ती दारू विकत होता. पोलिसांना माहिती (Amravati Police) मिळताच त्यांनी या गोरख धंद्यावर छापा टाकून तेथून लाखो लिटर केमिकल, प्रिंटिंग मशीन व दारूच्या रिकाम्या बॉटल जप्त केले आहे. यामध्ये पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांच्यासह गुन्हे शाखेच्या युनिट १ ने कारवाई केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com